विधवा प्रथेला मूठमाती देणारी टाकळी ठरली पहिली ग्रामपंचायत

टाकळी (ता. चाळीसगाव) ग्रामसभेत सरपंच कविता महाजन यांच्या पुढाकाराने विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर झाला.
विधवा प्रथेला मूठमाती देणारी टाकळी ठरली पहिली ग्रामपंचायत
Takli Village panchayat MeetingSarkarnama

चाळीसगाव : राजमाता अहिल्यादेवी होळकर (Queen Mother Ahilyadevi Holkar) जयंतीचे औचित्य साधून टाकळी (Jalgaon) प्र. चा. ग्रामपंचायतीने विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. शासनाच्या (Maharashtra Government) आवाहनाला प्रतिसाद देत असा निर्णय घेणारी ही जळगाव जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. (Takali village panchayat take initiative for close down Widow practice)

Takli Village panchayat Meeting
राज्यसभा निवडणूक : MIM आमदाराला मोठी ऑफर!

शासनाच्या निर्देशानुसार, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विधवा प्रथा बंदीची अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली आहे. राज्यात हेरवाड (जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीने सर्वप्रथम असा ठराव मंजूर केला. त्याचा आदर्श घेत, चाळीसगावला लागूनच असलेल्या टाकळी प्र. चा. ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता महाजन यांनी देखील आपल्या गावात या प्रथेवर बंदी आणण्याचा विचार सुरवातीला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मांडला.

Takli Village panchayat Meeting
मराठा समाजात छगन भुजबळांसारखे नेते नाहीत याचं वाईट वाटतंय!

त्यावर सकारात्मक चर्चा होऊन सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ग्रामसभेत सर्वानुमते ठराव करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार, आज ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचा ठराव मांडून तो सर्व संमतीने मंजूर करण्यात आला. सुरवातीला राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विधवा प्रथा बंदीचा ठराव ग्रामसभेचे सचिव तथा ग्रामसेवक श्री .वाडीले यांनी मांडला. या संदर्भातील १७ मे २०२२ चा विधवा प्रथेविरुद्ध राज्य सरकारचा निर्णय त्यांनी वाचून दाखवला.

विधवांचे मनोधैर्य उंचावणार

गावात पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, बांगड्या तोडणे यासारख्या विधवांशी संबंधित प्रथांवर आम्ही आता बंदी घातली आहे. महिलांना जुन्या रूढींच्या बंधनातून मुक्त केले जावे, या दृष्टीने एक महिला म्हणून आपण हे पाऊल उचलले असल्याचे सरपंच कविता महाजन यांनी सांगितले. विधवांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता या प्रथेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगून हा ठराव सर्वानुमते पारीत केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.

यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकारी नीता सामंत यांनी टाकळी प्र. चा. ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. इतर ग्रामपंचायतींनी देखील हा आदर्श घेऊन महिलांच्या सन्मानासाठी विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. विजया चव्हाण, वैशाली निकम, उपसरपंच किसनराव जोर्वेकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला ग्रामपंचायत सदस्य पी. ओ. महाजन, श्याम गवळी, प्रमिला गुजर, विजय पाटील, बाबू आचारी, सामाजिक कार्यकर्ते सागर नागणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in