Kisan Sabha March; ‘आदिवासीं’चे लाल वादळ थांबणार नाही!

बैठक रद्द झाली तरीही आम्ही मागण्यांवर ठाम असल्याने मार्च मुंबईच्या दिशेने पुढे निघाला.
Kisan sabha March at Igatpuri
Kisan sabha March at IgatpuriSarkarnama

नाशिक: राज्यातील (Maharashtra) आदिवासींसह शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, (CPM) किसान सभा (Kisan Sabha) आणि समविचार पक्षांच्या नेतृत्वाखालील पायी ‘लॉंग मार्च’ आज इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला. मुंबईत (Mumbai) होणारी बैठक रद्द झाली तरीही किसान सभा मागण्यांबाबत ठाम असल्याने त्यांनी मार्च सुरुच राहील असा निर्धार व्यक्त केला. (CPM trible farmers march move today from Igatpuri to Mumbai)

Kisan sabha March at Igatpuri
Nashik Loksabha; अमृता पवार ठरू शकतात लोकसभेच्या गेम चेंजर!

राज्यभरातून आलेले सुमारे सहा हजार आंदोलक यात सहभागी झाले आहेत. मुंबईत विधानभवनात अधिवेशन सुरू असल्याने पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनातर्फे लॉंग मार्च रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही. आज याबाबत मंत्रीस्तराव बैठक होणार होती. ती देखील रद्द झाली.

सोमवारी रात्री हा लॉंगमार्च मुंढेगाव परिसरात मुक्कामी पोहचला आहे. यासाठी शहर, जिल्हा पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले होते. तत्पुर्वी लॉंग मार्च रविवारी नाशिकमध्ये दाखल झाला. माजी आमदार जे. पी. गावित यांनी लॉंग मार्चची हाक दिली होती.

Kisan sabha March at Igatpuri
Shivsena News; उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

त्यानुसार नाशिक जिल्ह्यासह पालघर, अहमदनगर, नांदेड, जालना, बुलढाणा आदी जिल्ह्यांतून सुमारे सहा हजार आदिवसी बांधव यात सहभागी झाले आहेत. तर, इगतपुरीतून त्र्यंबकेश्‍वरसह शहापूर, डहाणू, नवी मुंबई या परिसरातील आदिवासी शेतकरीही सहभागी होणार आहेत. सोमवारी सकाळी म्हसरूळ येथून लॉंग मार्चला सुरवात झाली.

गांभीर्याने घ्या अन्यथा मुंबईला धडकणार

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री यांनी प्रश्न समजून घेतले. मात्र आमचे प्रश्न शासन पातळीवर आहेत. त्यामुळे एकट्या पालकमंत्री हे प्रश्न सोडवू शकत नाही. आमच्या भावना मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व संबधित खात्यांच्या मंत्र्यांकडे आमच्या भावना मांडा.सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावेत, अशी आमची भूमिका आहे.प्रश्न समजून घेत ते सोडविण्याची भावना जर सरकारची असेल,तर आमच्याशी चर्चा करावी.

Kisan sabha March at Igatpuri
Maharashtra Political Crises: सत्तासंघर्षाच्या लढाईत मतदारांचा हस्तक्षेप; कपिल सिब्बल बाजू मांडणार

त्यातून मार्ग निघेल.उन्हातान्हात पायी जाऊन संघर्ष करण्याची वेळ येणे हे बरोबर नाही,हे आम्हाला पण समजते. प्रश्न सुटत नसल्याने आम्हाला पुन्हा मुंबईच्या पुन्हा जावे लागत आहे.हे सरकार आमचे प्रश्न समजून घेत दिलासा देईल अशी खात्री आहे.मात्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर आम्ही मुंबईला धडकणार आहोत,अशी प्रतिक्रिया लॉंग मार्च प्रणेते माजी आमदार जे.पी.गावित यांनी 'ॲग्रोवन'शी बोलताना दिली.

श्री. गावीत, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. उदय नारकर, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, जनवादी महिला संघटनेचे मारियम ढवळे, इंद्रजित गावित, मोहन जाधव, रमेश चौधरी, सुभाष चौधरी, भीका राठोड, सावळीराम पवार आदीसंह आदिवासी बांधव मोर्चाच सहभागी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com