आमदार कांदेंना अंडरवर्ल्डची धमकी; भुजबळांनी उचलले हे पाऊल

छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात निधी वाटपाचा वाद आहे
Suhas Kande-Chhagan Bhujbal
Suhas Kande-Chhagan BhujbalSarkarnama

मुंबई ः नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात न्यायालयात दाखलेली याचिका मागे घेण्यासाठी आपल्याला अंडरवर्ल्ड डॅान छोटा राजनच्या माणसांकडून धमकी देण्यात आली आहे, असा दावा शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांना केली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांना दिले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर आहे. यातील दोषींवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीतूनच नाशिकच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत. (Take stern action against those who threatened Suhas Kande: Chhagan Bhujbal)

आमदारांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबतची माहिती आपल्याला मिळाली. आपण ही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती स्वतः छगन भुजबळ यांनी दिली. दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नाही, असा इशाराही छगन भुजबळ यांनी दिला आहे.

Suhas Kande-Chhagan Bhujbal
निवृत्त अधिकाऱ्यासही सहकारी साखर कारखानदारीची गोडी

काय आहे प्रकरण

नांदगाव मतदारसंघाच्या विकासकामाच्या आढावा बैठकीत यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निधीचा विनियोग नीट केलेला नाही. तसेच दहा कोटींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप आमदार सुहास कांदे केला होता. त्यावरून कांदे आणि भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. तो वाद अद्याप संपलेला नाही. दिवसेंदिवस तो वाढतच चालला आहे.

Suhas Kande-Chhagan Bhujbal
शिवसेनेचे पालकमंत्री आपल्या जिल्हाध्यक्षांनाही विचारत नाहीत : काँग्रेस कार्यकर्त्यांचे गाऱ्हाणे

यासंदर्भात कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याची अद्याप सुनावणी झालेली नाही. त्यावरून सुरु झालेला वाद आज वेगळ्याच वळणावर पोचला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार आली आहे. त्यानुसार हा खठला मागे घ्यावा यासाठी छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे याने ९६६४६६६६७६ या क्रमांकावरून दुरध्वनी केला. हा खटला मागे घ्या, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असे धमकावले, असे नाशिक पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com