Nashik Graduate Election : विखे पाटलांच्या गावातील पोलिंग बूथ तहसीलदारांनी केंद्राबाहेर हलवला

महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनी याच केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
 Loni Voting center
Loni Voting centerSarkarnama

कोल्हार (जि. नगर) : विधान परिषद निवडणुकीत नाशिक (Nashik) मतदारसंघ सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे संपूर्ण राज्यात गाजला. मतदानाच्या दिवशीही नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यात नगरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या गावात लोणीमध्ये (Loni) घडलेल्या घटनेची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. (Tahsildar moved polling booth in Loni up to two hundred meters outside Voting center)

नाशिक पदवीधरसाठी आज (ता. ३० जानेवारी) सकाळी राहता तालुक्यातील लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात मतदान सुरू झाले. राहात्याचे परीविक्षाधीन तहसीलदार विकास गंबरे मतदान केंद्रावर येताच केंद्राच्या दोनशे मीटरच्या परिसरातील पोलिंग बूथ केंद्राबाहेर हलविण्याचा आदेश दिला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने ते बूथ दोनशे मीटरच्या बाहेर हलवला. तसेच बूथसाठी उभारलेला मंडपही काढून टाकण्यात आला. मतदान सुरू झाल्यावर काही वेळातच हा प्रसंग घडला. तहसीलदारांच्या या कडक नियमावलीच्या अंमलबजावणीने लोणीकरांना माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांची आठवण झाली.

 Loni Voting center
Narendra Patil On Shinde : सरकारला ७ महिने झाले अन॒ मुख्यमंत्री शिंदेंवर पाहिला हल्लाबोल भाजप उपाध्यक्षानेच केला...

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातील महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांच्या मतदानाला सकाळी नियोजित वेळेनुसार सुरुवात झाली. मतदारांना मतदान क्रमांक व केंद्र क्रमांक(वर्गखोली) शोधून देण्यासाठी मदतनीस म्हणून पोलिंग बूथची व्यवस्था असते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ती व्यवस्था मात्र मतदान केंद्राच्या दोनशे मीटरच्या बाहेरच करायची असते. मात्र, हा नियम धाब्यावर ठेवून शाळेच्या प्रवेशद्वाराच्या आत मंडप उभारून त्याठिकाणी टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या व पोलिंगबूथचे कर्मचारी मतदान प्रक्रियेतील मदतनीसाचे काम करीत होते.

 Loni Voting center
Sharad Pawar News : पवारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; राष्ट्रवादी खासदारावरील निलंबन मागे घेण्याची केली विनंती

त्याकडे कोणीच फारसे गांभीर्याने पाहिले नाही. मतदान सुरू झाले. काही वेळाने तहसीलदार विकास गंबरे यांची गाडी मतदान केंद्रात शिरताच ती प्रवेशद्वाराजवळ थबकली. केंद्राच्या शाळेच्या आवारातील बूथ पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी सर्व बूथ तातडीने प्रवेशद्वाराबाहेर हलविण्याचे आदेश लोणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांना दिले.

Mantralaya News : ‘भाचा’ गेला अन्‌ ‘मेहुणा’ आला...सरकारी मेहुण्याचे ‘विपुल कारनामे’ पाहून भाजप नेत्यांचा डोक्याला हात

पाटील यांनीही आदेशाची कार्यवाही सुरू केली. केंद्राच्या आवारात ये-जा करणे शक्य नसलेल्या मतदारांची वाहने तसेच शासकीय कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना वाहने नेण्याची परवानगी नाही. तरीसुद्धा अनेक पदवीधरांनी आपल्या दुचाकी केंद्राच्या आवारात आणि विशेष म्हणजे थेट प्रवेशद्वारातच उभ्या केल्या होत्या. त्यांची संख्या एवढी होती की, मतदारांना ये-जा करताना अडचणी येत होत्या. समाधान पाटील व पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना करून सर्व दुचाकी बाहेर काढावयास लावल्या. एवढेच नव्हे तर मतदान केंद्रातील अगंतूक व्यक्तींनाही बाहेर जाण्यास सांगितले.

 Loni Voting center
Laxman Dhoble On Rajan Patil : राष्ट्रवादी सोडल्यानंतर ढोबळेंनी प्रथमच केले राजन पाटलांचे कौतुक : म्हणाले, ‘वाकड्या नजरेने कधी...’

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मतदानासाठी येईपर्यंत महसूल व पोलिस प्रशासन अधिकच अलर्ट झाल्याचे दिसत होते. मंत्री विखे यांनी मतदानाचा हक्क बजावला. माध्यमांशी संवाद साधून ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. मात्र, तहसीलदार यांच्या कडक स्वभावाची लोणीत चर्चा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com