तहसीलदारांच्या आपुलकीने `त्या` ज्येष्ठाने आत्महत्येचा विचार सोडला!

आत्महत्येच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्याला ‘तहसील’कडून जगण्याचे बळ
dar Nitinkumar devre talking to senior citizen

dar Nitinkumar devre talking to senior citizen

Sarkarnama

धरणगाव : येथील एका ज्येष्ठाला तीन मुले, जमीन जुमला असूनही जगण्यासाठी धडपड करावी लागत होती. या नैराश्येतून आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात येत होता. मात्र, शासनाकडे (State Government) शेवटचा पर्याय म्हणून पाहावा, असे वाटले आणि ते तहसीलदार कार्यालयात गेले. येथे त्यांना मिळालेली आपुलकीची वागणूक, सहकार्याने त्यांच्यांत जगण्याची नवी पालवी फुटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

<div class="paragraphs"><p>dar Nitinkumar devre talking to senior citizen</p></div>
धुळ्याची शिवसेना प्रतिमा अन् अंतर्गत वादात रूतली!

गुजराती गल्ली (धरणगाव) येथील जगन्नाथ तुकाराम धनगर हे तहसील कार्यालयात आपल्या परिस्थितीचे कथन करण्यासाठी व न्याय मागण्यासाठी आले होते. त्यावेळी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तत्काळ वृद्धाचे अश्रू पुसले आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे... याची प्रचिती त्यांना दिली. योग्य मार्गदर्शन करून न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन त्यांनी या वेळी दिले.

<div class="paragraphs"><p>dar Nitinkumar devre talking to senior citizen</p></div>
शिवसेना म्हणते, धुळे शहरातही मालमत्ता कर माफ करा!

श्री. धनगर यांची तीन मुले दिलीप, अरुण व गोविंदा यांनी २०१९ मध्ये त्यांच्या वृद्धत्वाचा फायदा घेऊन व त्यांना अंधारात ठेवून परस्पर अंगठा टेकवून घेत त्यांची मिळकत स्वतःच्या नावे करून घेतली. या बाबीची तक्रार करण्यासाठी जगन्नाथ धनगर हे बुधवारी (ता. ५) तहसील कार्यालयात आले होते. तहसीलदारांनी त्यांची कैफियत ऐकून घेत स्वत: जमिनीचे सातबारा उतारा ऑनलाइन काढून तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले.

त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आई-वडील ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००६ चे कलम ४५, ११ व १६ प्रमाणे दाद देण्याचे अधिकार प्रांत अधिकारी यांच्याकडे असल्याचे समजावून सांगितले व प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज करण्यास सांगितले. परंतु, वृद्धापकाळामुळे व निराशेमुळे आत्महत्येच्या मार्गावर निघालेल्या धनगर यांना अर्ज करण्याचेही भान नसल्याचे ओळखून तहसीलदार देवरे यांनी स्वतः महसूल सहाय्यक पंकज शिंदे यांच्या मदतीने अर्ज स्वतःच्या कॉम्प्युटरवर टाईप करून दिला.

सर्व कागदपत्रे, प्रिंटाऊट व झेरॉक्स काढून सदर प्रस्ताव तत्काळ बनवून शिपाई निजाम शेख यांच्या हस्ते एरंडोल येथील प्रांत कार्यालयात दाखल केला. या तत्काळ कार्यवाहीमुळे या वृद्धाने समाधान व्यक्त केले व माझ्या मुलांपासून मला न्याय मिळावा, अशी विनंती केली. तहसीलदार देवरे यांनी त्यांना आपल्या शासकीय वाहनांतून घरापर्यंत वाहनचालक मनोज पाटील यांच्या मदतीने सोडले. यामुळे जगन्नाथ धनगर यांनी ‘मला जगण्याची आशा मिळाली’, असे भावोद्‌गार काढले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com