Chhagan Bhujbal News : देशातील २३ संस्थांची मोदींच्या काळात विक्री झाली.

आरक्षण केवळ राजकारणासाठी नाही तर सर्व समाजाच्या विकासासाठी असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Sharad Pawar & Chhagan BhujbalSarkarnama

Trible mission foundation day : देशविरोधी काम करणाऱ्यांना धडा शिकविण्याची ताकद दलीत, ओबीसी आणि आदिवासींमध्ये आहे. त्यामुळे या तीन्ही समाजानी एकजूट करून लढा देण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच आपल्यावरील अन्याय आपण दूर करू शकू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Trible, SC & OBC have a capacity to fight against anti netional ferces)

सिवनी (मध्यप्रदेश) येथे आज आदिवासी (Trible) मिशन स्थापना दिवस आदिवासी अधिकार परिषद झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपस्थितांना संबोधित केले.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Shivsena Group News : एकनाथ शिंदे हे `नायक` सिनेमातील मुख्यमंत्र्यांसारखेच लोकप्रिय!

याप्रसंगी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आमदार अर्जुनसिंग काकोडिया, आमदार ओंकार सिंग मरकाम, मोहम्मद अन्सार अली, सलील देशमुख, राजकुमार खुराणा, मौलाना कहार, चौधरी गंभीरसिंग, बिरसा ब्रिगेडचे सतीश पेंदाम यांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की, आपल्या अवघ्या २५ वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध लढा दिला. देशातील आदिवासी बांधवांमध्ये त्यांनी चेतना जागविली. प्रसंगी आदिवासींना आपले हक्क मिळावे यासाठी आदिवासी आणि बिगरआदिवासी जमिनींबाबत कायदा करण्यास ब्रिटिशांना भाग पाडले. आजही हा कायदा आहे. मात्र दमणशाहीच्या रूपाने आदिवासींच्या जमिनी बळकविण्याचा प्रयत्न केला जात जात आहे.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Chhatrapati Sanyogitaraje Issue : अवमान करणारा पुजारी सुधीरदास वादग्रस्तच!

ते पुढे म्हणाले की, देशात ज्या ज्या ठिकाणी धरण बांधली गेली, प्रकल्प उभे राहिले त्या ठिकाणी आदिवासी बांधव सर्वाधिक स्थलांतरित झाले. देशाच्या विकासासाठी आदिवासी बांधवांनी मोठी किंमत आजवर मोजली आहे. मात्र आजही त्यांचे प्रश्न कायम आहेत.

पुनर्वसन, शिक्षण, कुपोषण, वनजमिनींचा हक्क असे अनेक प्रश्न समाजापुढे आहे. शिक्षणापासून आजही हा समाज वंचित आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे आजही हे प्रश्न सुटत नाहीत. आदिवासी बांधवांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने आदिवासी बांधवांना आपले मानवाधिकार मिळायला हवे अशी घोषणा केली आहे. मात्र त्या अधिकारांपासून आजही समाज वंचित असून कायदा आपले काम करत असताना समाजाने देखील जागृत राहणे तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Pimpalgaon APMC election news : दिलीप बनकर आणि अनिल कदम राजकारण तापले!

ते म्हणाले की, या देशात २०१४ च्या अगोदर अनेक महत्वपूर्ण अशा संस्था उभारण्यात आलेल्या होत्या. त्यातील सुमारे २३ संस्था मोदी सरकारच्या काळात विकल्या गेल्या. अजूनही विकल्या जात आहे. २०१४ नंतर मात्र एकही महत्वाची संस्था निर्माण होऊ शकली नाही. आजवर साडेअकरा लाख कोटींहून अधिक कर्ज उद्योजकांना माफ करण्यात आले आहे.

अनेक उद्योजक कर्ज घेऊन देशाबाहेर पळून गेले आहे. हे पैसे वसूल करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंवर अधिक कर लावला जात आहे. हा सर्व पैसा सर्वसामान्य नागरिकांकडून वसूल केला जात आहे. या विरुद्ध कुणी आवाज उठविला चोराला चोर म्हटलं तर लगेचच त्याला शिक्षा होतेय अशी टीका करत देशात अन्याया विरुद्ध आवाज उठविणाऱ्याचा आवाज दाबला जात आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Jitendra Awhad News : संविधानाची प्रत हाती घेऊन केला काळाराम मंदिरात प्रवेश!

ते म्हणाले की, कुठल्याही समाजाला दिलेलं आरक्षण हे केवळ राजकारणासाठी नाही तर समाजाच्या विकासासाठी महत्वाचे आहे. त्या समाजाच्या विकासासाठी निधीची तरतूद केली जाते त्यातून त्या समाजाचा विकास होतो. मात्र देशात या आरक्षणावरही गदा आणली जात आहे. संपूर्ण देशातील आदिवासी,अनुसूचितजाती, ओबीसी बांधवांचे आरक्षण आज धोक्यात आहे. जे लोक सध्या ओबीसींच्या जीवावर सत्ता भोगत आहे. ते त्यांचा केवळ राजकीय हितासाठी वापर करताय अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, या देशात अन्यायाविरुद्ध लढा देण्याची ताकद दलीत, ओबीसी आणि आदिवासी बांधवांमध्ये आहे. त्यामुळे या समाजाने आपली एकजूट ठेऊन पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com