Swarajya; कर्नाटकात घुसून कन्नडीगांना धडा शिकवू!

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बँकेला फासले काळे
Swarajya agitaion in Nashik
Swarajya agitaion in NashikSarkarnama

नाशिक : छत्रपती शिवरायांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह आहे. कर्नाटक (Karnataka) सरकारने हा प्रायोजित विध्वंस तात्काळ थांबवावा अन्यथा शिवरायांचा महाराष्ट्र (Maharashtra) अन्यायाचा वचपा काढून जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या (Swarajya Organisation) कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी शहरातील कर्नाटक बँकेच्या फलकाला काळे फासून निषेध करण्यात आला. (Swarajya followers paint black colour on Karnataka Bank)

Swarajya agitaion in Nashik
Yeola News: तीन आमदार तरीही येवल्याला मिळेना अधिकारी!

यावेळी करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन झाले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या अस्मितेवर जर कोणी घाला घालीत असेल तर यापुढे त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. महाराष्ट्राची वाहने फोडून आम्ही फार मोठा पराक्रम केला असा समज कर्नाटकातील लोकांचा असेल तर स्वराज्य संघटना देखील एकही कर्नाटकची गाडी महाराष्ट्रात येऊ देणार नाही. कर्नाटकी माणसांना धंदे व्यवसाय महाराष्ट्रात करू देणार नाही. तुम्हाला मराठी लोकांच्या बद्दल एवढी चीड निर्माण होत असेल तर आम्हालाही तुमच्या चारपट चिड येते हेही विसरू नये.

Swarajya agitaion in Nashik
Dada Bhuse; आंदोलकांमधील मतभेद दादा भुसेंच्या पत्थ्यावर

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादाने वेगळे वळण घेतले आहे. पारंपारिक सीमा वाद जैसे थे असतांना महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली या जिल्ह्यात कर्नाटक सरकार हात- पाय पसरण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या योजत आहे. त्यामुळे हा मुद्दा आणखी संवेदनशील बनला आहे. कर्नाटक सरकारने कन्नडी जनतेला चिथावणी मिळेल अशी भूमिका घेतल्याने महाराष्ट्रातील वाहनांची नासधुस केली जात आहे.

बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकसह इतर वाहनांवर दगडफेक करण्यात आली. एकूणच हा कर्नाटक सरकारचा महाराष्ट्राविरुद्ध सुरु झालेला अघोषित लढा आहे. त्या विरोधात महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनाही सरसावल्या असून नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेने निषेध आंदोलन केले.

स्वराज्य संघटनेचे प्रदेश प्रवक्ते करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्रद्वेषी भूमिकेचा निषेध केला. यावेळी कर्नाटक सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील कर्नाटक बँकेच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत स्वराज्यच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या फलकाला काळे फासले. कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

या आंदोलनात संघटनेचे निमंत्रक आशिष हिरे, प्रमोद जाधव, सुभाष गायकर, भारत पिंगळे, सागर जाधव, वैभव दळवी, शुभम देशमुख, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोतकर, किरण डोके, अर्जुन पाटील, संजय तुपलोंढे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com