वादग्रस्त पोलिस निरीक्षक बकाले आंदोलनालाही जुमानत नाही?

जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बकाले यांच्यावर कारवाईसाठी मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरु आहे.
PI Kirankumar Bakale
PI Kirankumar BakaleSarkarnama

जळगाव : मराठा समाजाबद्दल (Maratha Community) अपशब्द (hate speech) वापरणारे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले (Kirankumar Bakale) यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी मंगळवार पासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू (Hunger strike) करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन उपोषणाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. (Maratha Community deemand action and confiscation against PI Bakale)

PI Kirankumar Bakale
Rohit Pawar: शासकीय यंत्रणाचा गैरवापरातून लोकशाहीची पायमल्ली!

जळगाव येथील पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी केलेल्या तथाकथीत वादग्रस्त वक्तव्याचा विषय काही केल्या थांबण्याची चिन्हे नाहीत. हे सर्व होऊन देखील बकाले यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही.

PI Kirankumar Bakale
Chitra Wagh: `वरिष्ठ नेत्याने मला माझी जात विचारली होती`

स्वतः बकाले सध्या निलंबीत आहेत. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायासलयात अर्ज केलेला आहे. विविध संघटना, राजकीय पक्ष आक्रमक झाले असले तरीही बकाले यांनी मात्र त्याला जुमनले नाही, असे सध्याचे चित्र आहे.

पोलिस निरीक्षक बकाले यांना त्वरित अटक करण्यात यावी. लोकमानसाचा आदर करण्यात यावा. बकाले यांना बडतर्फ करून श्री. बकाले व पोलिस हवालदार महाजन यांच्यात संभाषण झालेला मोबाईल हॅंडसेट तत्काळ मुद्देमाल म्हणून जप्त करावा अशी मागणी आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात बकाले यांच्या संपत्तीची चौकशी करून बेकायदा संपत्ती तत्काळ सरकारजमा करावी अशी मागणी आहे. आम्ही सर्व समाजाचे, जातिधर्माचे लोक एकत्र येत महिलांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या, एखाद्या समाजाबद्दल अपशब्द वापरून तेढ निर्माण करणाऱ्या शासकीय सेवेतील या व्यक्‍तीला तत्काळ अटक करावी व पोलिस प्रशासनाने या कार्यवाहीत कुठलीही कसूर करू नये. एक महिना होऊनही कार्यवाही होत नरोल तर समाजामध्ये पोलिस प्रशासनाबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण होईल, याबाबत दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सकल मराठा समाजाचे राम पवार, हिरामण चव्हाण, डॉ. संभाजी देसाई, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, धवल पाटील, वाल्मीक पाटील, सुनील पाटील, प्रफुल्ल पाटील, रमेश बाऱ्हे, उज्ज्वल पाटील, विवेक बोढरे, मिलिंद सोनवणे, अमोल बाविस्कर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com