Maratha: निलंबित पोलिस निरिक्षक बकालेंना अटक केव्हा करणार?

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करावी या मागणीसाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
Maratha orgnisation womens
Maratha orgnisation womensSarkarnama

जळगाव : पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले (Controversial PI Kirankumar Bakale) यांनी मराठा समाजाबद्दल (Maratha Community) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे बकाले यांना बडतर्फे करावे. दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Maratha Organisations Deemand arrest Of PI Kirankumar Bakale)

Maratha orgnisation womens
Dr. Nilam Gorhe: पिडितेच्या पालकांवर दबाव टाकणारे `ते` पोलिस कोण?

निलंबित करण्यात आलेले आहे. या प्रकरणात त्यांना संपूर्ण दोषी ठरवून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा समाजातील विविध संघटनांनी शनिवारी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Maratha orgnisation womens
NCP: युवतीवर अत्याचार होऊनही महाराष्ट्रातील `इडी` सरकार संवेदनाहीन!

या प्रकरणी सहायक फौजदार अशोक ओंकार महाजन यांना निलंबित करण्यात आलेले आहे. या प्रकरणाशी त्यांचा काही एक संबंध नसताना त्यांना निलंबित करण्यात आले हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. त्यामुळे श्री. महाजन यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पूर्ववत शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी विनंती मराठा समाजाच्या वतीने विविध संघटनांनी केली.

यामध्ये मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, अ. भा. छावा संघटना, बुलंद छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज या सर्व संघटनांचा समावेष आहे. डॉ. मुंडे यांनी आश्वासन दिले, की अधिकारी बकाले यांच्यावर कठोर कार्यवाही जरुर केली जाईल तसेच अशोक महाजन यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही.

निवेदन देताना प्रा. डी. डी. बच्छाव, राम पवार, हिरामण चव्हाण, मधुकर पाटील, गिरीश पवार, चंद्रकांत देसले, दिनेश कदम, सुरेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, संतोष पाटील, नंदू सोनवणे, विनोद देशमुख, विजय देसाई, सुचिता पाटील, मनीषा पाटील, लीना पवार, गीतांजली देसाई आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com