सहलीवर गेलेल्या नगरसेविकेचे हृदयविकाराने निधन; भाजपच्या सत्तेच्या मोहिमेला मोठा धक्का

सुरगाणा नगरपंचायतीच्या नगरसेविका काशीबाई पवार यांचे हृदयविकाराने निधन
Kashibai Pawar
Kashibai PawarSarkarnama

नाशिक : सुरगाणा (जि. नाशिक) नगरपंचायतीच्या सहलीवर गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (bjp) नवनिर्वाचित नगरसेविकेचे (corporator) आज (ता. १३ फेब्रुवारी) सकाळी हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. काशीबाई पवार असे त्यांचे नाव असून त्या सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १६ मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. नगराध्यक्ष निवडीपूर्वीच पवार यांचा मृत्यू झाल्याने भाजपच्या नगराध्यक्ष निवडीच्या मोहिमेला धक्का बसला आहे. (Surgana Nagar Panchayat corporator Kashibai Pawar dies to heart attack)

सुरगाणा नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक आठ जागा मिळाल्या होत्या. त्याखालोखाल शिवसेनेला सहा, माकपला दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादीची समान संख्या झाली आहे. त्यामुळे माकप किंगमेकरच्या भूमिकेत आला आहे.

Kashibai Pawar
उमेदवारी नाकारल्याने ३० वर्षे संचालक असलेल्या ढमढेरेंचा राष्ट्रवादीविरोधातच शड्डू!

सुरगाणाच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी सर्वाधिक आठ जागा जिंकणाऱ्या भाजपने कोणताही दगाफटका होऊ नये; म्हणून आपल्या नगरसेविकांना सहलीवर पाठवले आहे. त्यामध्ये काशीबाई पवार यांचा समावेश होता. मुक्कामी असलेल्या हाॅटेलमध्येच नगरसेविका काशीबाई पवार यांना आज (ता. १३ फेब्रुवारी) सकाळी नऊच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. काशीबाई पवार या सुरगाणा नगरपंचायतीत वॉर्ड क्रमांक १६ मधून निवडून आल्या होत्या.

Kashibai Pawar
स्वकीयांनी केलेला घात विसरणार नाही; भविष्यात हिशेब करू : राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

नगराध्यक्ष निवडणुकीच्या अगोदर येऊन बहुमत जाहीर करण्याचा भाजपचा कल होता. मात्र, वापी येथे एका हॉटेलमध्ये थांबले असताना नगरसेविका काशीबाई पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेविकेची संख्या आता समान झाली आहे, त्यामुळे नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार, याकडे नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोन जागा जिंकणाऱ्या माकपच्या हाती नगराध्यक्षपदाच्या निवडीची चावी असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com