सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्रजी, उद्धवजी आणि राज तुमचे जाहीर आभार!

खासदार सुप्रिया सुळे आज नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केतकी चितळे प्रकरणावर मत व्यक्त केले.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

नाशिक : राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या (NCP) महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा मी समर्थन करणार नाही. मात्र कोणाच्याही वडिलांनी मरावं अस बोलणं कोणत्या संस्कृतीत बसत?. यासंदर्भात केतकी चितळेचे कान टोचले त्याबाबत उद्धवजी, (Uddhav Thakre) देवेंद्रजी (Devendra Fadanvis) आणि राज ठाकरे (Raj Thakre) यांचे जाहीर आभार. अशी वेळ दुसऱ्या कोणावर आली तर मी देखील तुमच्या सोबत उभी राहीन या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केतकी चितळे प्रकरणावर आपली प्रतिक्रीया दिली. (NCP leader Supriya sule given thanks to CM, LOP & Raj Thakre on Ketaki Chitale issue)

Supriya Sule
शरद पवारांवर निंदनीय वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

सुप्रिया सुळे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्या नाशिकला आल्या होत्या. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. केतकी चितळे प्रकरणावर त्यांनी खंत व्यक्त केली.

Supriya Sule
धुळ्यात सहकारात काँग्रेसची आगेकूच सुरुच!

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मुंबईतील सभा व त्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याबाबत त्या बोलल्या. त्या म्हणाल्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो हे वास्तव आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाबत काय झालं? १०९ वेळा देशमुख यांच्यावर रेड करण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला. मग १०८ वेळेस तुम्ही काय करत होतात?. काहीच मिळालं नाही म्हणून एवढ्या वेळेस रेड कराव्या लागल्या. यावर भाजपचे नेते काय खुलास करतील. काय बोलतील, असा प्रश्न त्यांनी केला.

केतकी चितळे हीच्या पोस्ट बाबत त्यांनी खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, काही लोकांनी त्यांच्या वॉल वर काहितरी लिहिलं आहे. मात्र कुठल्याच कायद्यात हे बसत नाही. हे खूप दुर्दैवी आहे. न्यायालय त्याचं काम करेल. यावर मी अधिक काही बोलू इच्छीत नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धवजी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, त्याबाबत मी त्यांची आभारी आहे.

यासंदर्भात विरोधकांकडून जी भूमिका मांडली जात आहे, त्याचा देखील त्यांनी समाचार घेतला. अमोल मिटकरी यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याबाबत देखील त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. देशात एक यंत्रणा आहे. पोलीस स्टेशन आणि कोर्ट आहेत. माध्यमाचा गैरवापर करनं हे देखील हास्यास्पद आहे. मी भान ठेवून वागते. माझ्यावर मराठी मध्यमवर्गीय संस्कृतीचे संस्कार आहेत, असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, ५५ वर्ष हल्ले होऊन देखील माझ्या वडिलांनी पण कोणाला अस उत्तर दिलं नाही, ही आमची संस्कृती आहे. त्याचा मला त्याचा अभिमान आहे.

आमदार अकबर औवेसी यांनी खुलताबाद येथे बादशहा अकबर यांच्या समाधीचे दर्शन केले. याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मी या गोष्टींचा इतका विचार करीत नाही. मला माझ्या मतदार संघात खूप काम आहे. जनतेला झळ बसलेल्या महागाई, स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर यापेक्षा मला काही महत्वाचं वाटत नाही. (कै) सुषमाजी म्हटल्या होत्या, आकडोंसे पेट नाही भरता. पंतप्रधानांना माझी विनंती आहे की, सर्व पक्षीयांची बैठक बोलावून महागाईवर काय करू शकतो यावर चर्चा करा.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com