समर्थक म्हणतात, आता सुहास कांदेंना लाल दिवा मिळणारच!

आमदार सुहास कांदेंच्या भुमिकेविषयी मतदारसंघात उत्सुकता वाढली.
समर्थक म्हणतात, आता सुहास कांदेंना लाल दिवा मिळणारच!
Suhas Kande With Eknath Shinde, Nashik News, Suhas Kande News, Eknath Shinde NewsSarkarnama

नांदगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आमदारांना भावनिक साद घातली. त्यामुळे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या भुमिकेकडे नांदगावच्या जनतेचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर आमदार सुहास कांदे समर्थक मात्र ही मंत्रीपदाची संधी म्हणून पहात आहेत. आता त्यांना लाल दिवा मिळणारच अशी चर्चा रंगली आहे. (Nandgaon people expecting Suhas Kande`s clarification)

Suhas Kande With Eknath Shinde, Nashik News, Suhas Kande News, Eknath Shinde News
शिंदे असो वा राणे, प्रत्येक बंडात नाशिक केंद्रस्थानी!

सुरतहून गुवाहाटी मुक्कामाला गेलेल्या आमदारांच्या एकत्रित फोटोत दिसत आमदार सुहास कांदे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसले. थेट प्रतिक्रियेसाठी अजून तरी उपलब्ध झालेले नव्हते. नाशिक जिल्ह्यातून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार सुहास कांदे हे एकमेव आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर आमदार कांदे यांनी वारंवार एकनाथ शिंदे यांच्या त्यांना नगरविकास विभागातून झालेल्या मदतीचा उल्लेख करीत असत. (Suhas Kande news)

Suhas Kande With Eknath Shinde, Nashik News, Suhas Kande News, Eknath Shinde News
उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जायला हवं होत ; दीपक केसरकरांकडून घरचा आहेर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या अतिशय निकटवर्तीयातले आमदार म्हणून कांदे यांची ओळख आहे. त्यांनी असा निर्णय का घेतला असावा, यबद्दल राजकीय पातळीवर मात्र अतिशय सावधपणे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यानिमित्ताने झालेल्या राजकीय घडामोडीत आमदार कांदे यांच्या आगामी वाटचालीकडे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

एकत्रित आघाडीत राहून घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षासोबत लढताना होणारी राजकीय कोंडी त्यांनी पक्षात मांडली होती. आमदार कांदे यांनी अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्याशी या वि,यावर बोलले. त्यानंतर शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने त्यांच्यामागे आपले पाठबळ उभे केले होते.

विधानसभा निवडणुकीत आपल्याला सर्वात जास्त विरोध भुजबळ यांच्याकडून होऊ शकतो हे हेरून आमदार कांदे यांनी भुजबळ यांच्याशी पंगा देखील घेतला. आता त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याने राजकीय समीकरणे कशी आकाराला येतात, हे पाहणे उत्कंठावर्धक असणार आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in