शिंदे सरकारचा ‘आनंदाचा शिधा’ गरीबांना नव्हे नेत्यांना?

स्वस्त धान्य दुकानांत खडखडाट, आनंदाचा दूर नियमीत शिधाही मिळेना.
Bag of Anandacha Shidha
Bag of Anandacha ShidhaSarkarnama

धुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घोषणा केलेला ‘आनंदाचा शिधा’ (Diwali Foodgrain) दिवाळी (Diwali Festival) संपली तरीही लोकांच्या हाती पडेना. एकीकडे राजकीय नेते (Political leaders) शिधा वाटपाचा गाजावाजा करीत आहेत. त्यामुळे हा शिधा गरजुंऐवजी नेत्यांकडेच पोहोचत आहे. त्यामुळे गरीबांची दिवाळी ‘आनंदाचा शिधा’ न मिळताच पार पडल्याचे चित्र आहे. (Supply of diwali food to fair price shop distureb)

Bag of Anandacha Shidha
‘मला शिरपूर तालुका भाजपमय करायचा’

राज्यभरात विविध आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ वाटप झाल्याची छायाचित्र, बातम्यांची सोशल मीडियावर धुम आहे. विविध नेते त्यातून आपली प्रतिमा उजळवून घेत आहेत. प्रत्यक्षात मात्र अनेक दुकानांत तसेच मागणीच्या तुलनेत अत्यंत अल्प पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारांकडे झाल्याने हा शिधा पोहोचलेलाच नाही.

Bag of Anandacha Shidha
शिंदे गटाकडून शुभेच्छांद्वारे ठाकरे गटात साखर पेरणी

दिवाळीनिमित्त राज्य शासनातर्फे घोषित ‘आनंदाचा शिधा‘चे आमदार फारुक शाह यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. दिवाळीसाठी राज्य सरकारतर्फे घोषित धुळे येथे ‘आनंदाचा शिधा‘ लाभार्थ्यांना वितरित करण्याची मागणी आपण जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली होती.

त्यानुसार धुळे शहरासह जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा‘ किटचे २४ ऑक्टोबरला वाटप करण्यात आल्याचे आमदार श्री. शाह यांनी म्हटले आहे. शंभर रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तूचा यात समावेश आहे. धुळे शहरातील शिवाजीनगर झोपडपट्टी रेशन दुकान नंबर-३२ येथे आमदार श्री. शाह यांच्याहस्ते किट वाटपाला सुरुवात झाली. नाशिक शहरात देखील शिंदे गटाचे कार्यकर्ते, आमदार, नेते व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधा वाटप झाल्याची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याचाच दुसरा अर्थ असा की, शिधा जनतेच्या पैशांचा मात्र चमकोगिरी नेत्यांची अशी स्थिती आहे.

सामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर केला. मात्र ज्या शिधा ज्यापिशव्यांमधून वाटायचा आहे, त्या पिशव्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो छापलेल्या या पिशव्यांमधूनच हे चार पदार्थ एकत्रित एका कीटच्या स्वरुपात देण्याचे आदेश होते. त्यामुळे चारही वस्तू आणि त्यासाठीची पिशवी उपलब्ध झाल्यावरच या वस्तू गरजुंपर्यंत पोहोचणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील अंतोदय प्राधान्याचे ७ लाख ९३ हजार ५९१ रेशनकार्डधारक कुटूंबांना या निर्णयाचा फायदा होईल असे सांगण्यात आले. मात्र दिवाळी तोंडावर आलेली असताना देखील हा आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही.

दिवाळी होऊन गेली. फराळाचे पदार्थ तयार करण्याची वेळ निघून गेली. मात्र गृहिणींना तास न तास स्वस्त धान्य दुकानांत आनंदाचा शिधा घेण्यासाठी आनंद तर दुर मनस्तापच सहन करावा लागत आहे. त्यात संथ संगणक, पुरवठा वाहनांची कमतरता, पिशव्यांची अडचण, पॅकींग असे अडथळे आहेत. महिला दिवाळी गोड होईल या आशेने लोक दुकानांत पोहोचत आहेत. पण सरकारचा हा आनंदाचा शिधा अद्याप स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचलाच नसल्याचे चित्र आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in