शिंदे साहेब...सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो!

शिवसेना उपनेते सुनील बागुल यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र
Sunil Bagul, Uddhav Thakre & Eknath Shinde
Sunil Bagul, Uddhav Thakre & Eknath ShindeSarkarnama

नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) वादात येथील उपनेते सुनिल बागूल (Sunil Bagul) यांनी श्री. शिंदे यांना भावनिक साद घातली आहे. तुमच्या स्वाभिमानाच्या भांडणात सामान्य शिवसैनिक मरतो आहे. त्याची परवड होते आहे. तुम्ही पक्ष सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो, असे पत्र श्री. बागूल यांनी लिहिले आहे. (Ordinary Shivsena workers in trouble in Eknath Shinde & Uddhav Thakre war)

Sunil Bagul, Uddhav Thakre & Eknath Shinde
कृषिमंत्री दादा भुसे यांनी ४० वर्षात कमवले ते बंडाने मातीत घातले!

श्री. बागुल हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि सध्या उपनेते आहेत. त्यांनी सामान्य शिवसेना कार्यकर्त्यांची भावना आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. तुम्ही म्हणता, आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. हिदूत्ववादी आहोत. मग अडचण काय?. सूरत आणि गुवाहाटीत राहून काय करता. मुंबईला या, पक्ष सोडू नका, आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांना समजाऊन सांगतो, असे पत्रात म्हटले आहे.

Sunil Bagul, Uddhav Thakre & Eknath Shinde
'राऊतांच्या सल्ल्याने अख्खी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधायची का?'

ते म्हणाले, गेल्या २१ तारखेपासून आम्ही श्री. शिंदे व दिपक केसरकर या तुम्ही दोन्ही नेत्यांच्या तोंडून आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडणार नाही. आम्ही दिघे साहेबांची शिवसैनिक आहोत, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आहोत. आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर सरकार नको तर आपण बीजेपी बरोबर सरकार स्थापन केले पाहिजे.

यावर उद्धव ठाकरे , "मी तयार आहे पण तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला जाऊन हे सांगत आहे. तुम्ही मला हे मुंबईत सांगू शकला असता. तुमच्या तत्वाच्या आणि स्वाभिमानाच्या भांडणात शिवसैनिक मरतो आहे. एक शिवसैनिक दुसऱ्या शिवसैनिकाचा बोर्ड पाडतोय. काळे फास्तो, विरोधात घोषणा देतो, मोर्चा काढतो, तिरडी काढतो, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतो आहे.

शिवसेनेच्या आमदारांची नातेवाईक आमदारांचे समर्थक व पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक हे शिवसेनेच्या विरोधात उभे राहून चॅलेंज करत आहे. शिवीगाळ करत आहे. आव्हान देत शक्ती प्रदर्शन करत आहे. या सर्वामध्ये शिवसैनिकच मरतो आहे. शिवसैनिकाला दोन्ही बाजू सांभाळायच्या असतात. त्याला दोन्ही प्रिय आहेत.

शिंदे साहेब! मी दिघे साहेब आणि तुमचे सुद्धा काम बघितले आहे. तुम्ही अनेक अॅम्बुलन्स वाटप केलेले आहे. तुम्ही अनेकांना रोजगार दिला. गरिबांसाठी तुम्ही जीव का प्राण आहात. शिवसेनेबद्दल कोणी चुकीचे बोलले, तर त्याच्या कानशीलात लावण्याची ताकद तुमच्यात आहे. शिवसेना तुमची जीव की प्राण आहे. तुम्ही शिवसैनिकांना अनेक संकटातून बाहेर काढले आहे. आज तुमच्या समोर शिवसेनेचे बॅनर फाडले जात आहेत. शिवसेना कार्यालयाची तोडफोड होते याचे दुःख तुम्हाला होऊन सुद्धा दाखवता येत नाही.

ज्या शिवसेनेवर तुम्ही प्रेम केलं त्याची दुर्देशा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या छातीमध्ये ८ स्टेन आहेत. त्यांच्या मानेची खूप मोठी सर्जरी झालेली आहे. त्यांना करोना झालेला आहे. त्यांची तब्येत खराब आहे, अशा परिस्थितीत तुमच्याकडे अनेक आमदार आहेत आणि रोज एक एक आमदार येतो आहे. हे सर्व बघितल्यानंतर मनाला खूप वेदना होत आहे. जी शिवसेना रात्र-पहाट करून वाढवली त्याची अशी दुर्दशा बघतांना मनाला खूप वेदना होतात.

ते पुढे म्हणाले, तुम्हाला शिवसेना पाहिजे, उद्धवर्जीना तुम्ही पाहिजे आणि तुम्हाला भाजप पाहिजे. याचा जर योग्य ताळमेळ झाला तर शिवसेना सुद्धा टिकेल. तुम्हाला जनतेच्या कामासाठी बीजेपी हवी आहे, तेसुद्धा साध्य करता येईल. परंतु इकडे तिकडे जाऊ नका. नको प्रहा , नको बीजेपी, नको मनसे आपण शिवसेनेतच रहा, असे आवाहन त्यांनी केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com