सुहास कांदे यांनी बेंबीच्या देठापासून एकनाथ शिंदेचा जयजयकार केला!

Eknath Shinde Updates : बंडखोर सेना आमदारांकडून उद्धव ठाकरेंचा नामोल्लेखही नाही
सुहास कांदे यांनी बेंबीच्या देठापासून एकनाथ शिंदेचा जयजयकार केला!
Suhas Kande & Rebel Shivsena MLASarkarnama

नाशिक : गुवाहटी येथे शिवसेनेचे (Shivsena) ४८ आमदार जमलेले आहेत. या आमदारांनी आज पुन्हा एकत्रीत व व्हीडीओ काढला. यावेळी आमदारांनी घोषणा दिल्या. यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, (Balasaheb Thackeray) शिवसेनेच्या घोषणा होत्या. मात्र यावेळी नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नावावे अगदी बेंबीच्या देठापासून घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांच्याच घोषणा सगळ्यांच्या लक्षात राहिल्या. (Suhas Kande given a loud slogan in the name of rebel Eknath Shinde)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यासाठी त्यांनी हिदुत्व आणि भाजपशीच युती करावी असे कारण दिले आहे. प्रत्यक्षातील कारणे काय याचे चर्वण सर्व स्तरावर आहे. यामध्ये दबाव निर्माण करण्यासाठी या आमदारांनी एकत्र येत घोषणा दिल्या. `शिवसेना जिंदाबाद`, `शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो`, `एकनाथ शिंदे यांचा विजय असो`, `एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है` अशा घोषणा होत्या.

Suhas Kande & Rebel Shivsena MLA
शिंदे असो वा राणे, प्रत्येक बंडात नाशिक केंद्रस्थानी!

या व्हीडीओमध्ये नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी या बंडाचे कर्ते करविते एकनाथ शिंदे यांच्या नावाने अगदी बेंबीच्या देठापासून घोषणा दिल्या. आमदार कांदे `एकनाथ शिंदे` असे मोठ्याने म्हणत होते, तर अन्य उपस्थित `विजय असो` असे म्हणत होते. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख कोणीही केला नाही, हे विशेष.

राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या पेचप्रसंगात शिवसेनेचे एक एक आमदार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जात आहे. साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी काल उद्धव ठाकरेंसोबत फोटो काढला होता. शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यादेखील एकनाथ शिंदे यांच्या गटात पोचल्या आहेत. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत त्या गेल्या.

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठे बंड झाले. शिवसेनानेते शिंदे काही आमदारांना घेऊन आधी सुरतला गेले. त्यानंतर ते आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत जाण्याची भूमिका मंडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in