एकनाथ खडसे अडचणीत; आता महिला आयोगाच्या कारवाई करण्याच्या सूचना
Eknath Khadsesarkarnama

एकनाथ खडसे अडचणीत; आता महिला आयोगाच्या कारवाई करण्याच्या सूचना

विक्रोळी पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या गुन्हात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची कुठलीही दखल पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे अंजली दमानिया यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्र पाठवून खडसे यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Eknath Khadse
...तर पत्रकार परिषद घेऊन पुरावे देईन : एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांना प्रत्युत्तर

एकनाथ खडसे यांनी 2 सप्टेंबर 2017 रोजी मुक्ताईनगर येथे आपल्या वाढदिवसा प्रसंगी बोलताना सामाजिक दमानिया यांना उद्देशून वक्तव्य केले होते. या प्रकरणी 7 सप्टेंबर 2017 रोजी दमानिया यांनी विक्रोळी पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही खडसे यांची तक्रार केली होती.

विक्रोळी पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या गुन्हात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणी अंजली दमानिया यांनी 27 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दिली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणाची दखल घेत जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

Eknath Khadse
युवासेनेचे नेते सरदेसाईंनी केलं सर्वच पक्षाच्या युवा संघटनांना आवाहन

दमानिया यांनी खडसे यांच्या आक्षेपार्ह विधानाची तक्रार फडणवीस यांच्याकडेही केली होती. दमानिया यांनी खडसेंच्या विधानाचा व्हिडीओ ट्विट केला होता. तसे सविस्तर पत्र लिहून फडणवीसांकडे तक्रार केली होती. खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा व त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली होती.

Related Stories

No stories found.