Tanaji Sawant News; आशा सेविकांच्या वेतन, सेवेबाबत धोरण ठरवणार

छगन भुजबळ यांच्या तारांकित प्रश्नांवर मंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama

मुंबई : आशा सेविकांना (ASHA Workers) नियमित वेतन व कायम करण्याबाबत राज्य शासनाने (Maharashtra Government) धोरण आखण्यात येईल. यासंदर्भात राज्य शासन अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करील. हा अहवाल केंद्र शासनाला (Centre Government) पाठविण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिले. (Chhagan Bhujbal raise issue of ASHA workers in Assembly)

Tanaji Sawant
Cantonment Election: देवळालीच्या निवडणुकीत भाजप विरोधात कसबा पॅटर्न!

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे याबाबत मागणी केली. त्यावर दिलेल्या उत्तरात शासन तज्ञ समितीची नेमणूक करून याबाबत अहवाल तयार करून केंद्र शासनास पाठविणार असल्याची माहिती मंत्री सावंत यांनी दिली.

Tanaji Sawant
Dindori Loksabha; राज्यमंत्री भारती पवार यांना `कसबा` पॅटर्नचे आव्हान?

राज्यातील आरोग्य विभागातील आशा सेविका गटप्रवर्तक व बीसीएम यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, आशा सेविकांना किमान वेतन आणि नियमित करण्याबाबत कुठलेही धोरण नाही.

नोकरीत सगळीकडे धोरणाचा अवलंब करण्यात येतो त्याप्रमाणेच आशा सेविकांसाठी सुद्धा धोरण आखण्यात यावे. आशा सेविकांचा निर्णय केंद्राचा जरी असला तरी केंद्र शासनावर अवलंबून न राहता माणुसकी आणि त्या करत असलेल्या सेवेच्या दृष्टीने विचार करून त्यांच्यासाठी निश्चित धोरण निर्माण करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

Tanaji Sawant
Neelam Gorhe News: मुख्यमंत्र्यांचे न ऐकणाऱ्या मंत्र्याला घरी जावे लागते!

त्यावरील उत्तरात आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, आशा वर्कर यांच्या वेतन व कायम सेवेच्या धोरणाबाबत शासन सकारात्मक आहे. हा विषय केंद्राचा असल्याने राज्यशासनाच्या वतीने तज्ञ समितीची नेमणूक करून अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर हा अहवाल मान्यतेसाठी केंद्र शासनास पाठविण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com