निवडणुकीच्या निकालाबाबत मुख्यमंत्र्यांसह सर्वांशी चर्चा करणार!

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य शासन तपशील मिळाल्यावर निर्णय घेणार.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) दोन आठवड्यात महापालिका (NMC) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा असा आदेश दिला आहे. वकिलांकडून त्याचा तपशील प्राप्त झाल्यावर मुख्यमंत्री, (Uddhav Thakrey) ) उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) व मंत्रीमंडळाकडे हा विषय नेणार आहोत. त्यानंतर पुढील धोरण ठरेल अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

Chhagan Bhujbal
नाशिकमध्ये ३९ मशिदींना अजानची परवानगी नाकारली!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. आज सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निवडणुका घेण्याचा जो निर्णय दिला त्याबाबत श्री. भुजबळ म्हणाले की, हा खटला राज्य सरकारने निवडणुकांबाबत जो नवीन कायदा केला, त्याला राहूल वाघ आणि अन्य काही मंडळींनी त्याला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, त्याबाबतचा निकाल आहे.

Chhagan Bhujbal
सहकारात काँग्रेसचेच वर्चस्व, विरोधक हद्दपार!

ते म्हणाले, राज्य सरकारने जो कायदा केला, तसाच कायदा मध्य प्रदेश राज्य सरकारचा देखील आहे. तो देखील प्रश्न न्यायालयापुढे होता. मात्र न्यायालयाने त्याबाबत आधी सध्याच्या ज्या रखडलेल्या निवडणुका आहेत, त्याचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करा.

याबाबत निश्चित काय आदेश आहेत त्याची माहिती वकिलांशी बोलून घेत आहोत. त्यानंतर राज्य सरकार पुढील कार्यवाही काय करायची हे ठरवेल. या निकालाने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर जाणार काय? याबाबत श्री. भुजबळ यांनी तुर्त मी यावर काहीच बोलणार नाही. वकिलांशी चर्चा करून नेमका निकाल काय आहे, दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, म्हणजे काय याचा अभ्यास करून मगच मला बोलता येईल. पावसाळ्यात निवडणुका घेता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने सादर केले होते. त्यामुळे काय होते ते पहावे लागेल.

सद्य परिस्थितीत निकालामुळे काय परिणाम होतील. त्याचा काय व कोणाला फायदा होईल यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळ आणि शरद पवार यांच्याशी देखील आम्ही चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com