Nashik News; `सारथी`ला नाशिकमध्ये शासनाकडून दीड एकर जमीन

राज्य शासनाने विशेष आदेशाद्वारे जमीन वर्ग केली.
Eknath Shinde & devendra Fadanvis
Eknath Shinde & devendra FadanvisSarkarnama

नाशिक : नव्याने सत्तेवर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार अतिशय वेगावे निर्णय घेत आहे. या शासनाने (State Government) आज `सारथी` (sarthi) संस्थेला शहरात दीड एकर जागा वर्ग केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. (Maratha community`s Deemand for land for student hostel & Other activity)

Eknath Shinde & devendra Fadanvis
उद्धव ठाकरेंना बंडखोर आमदाराच्या भगिनीची निष्ठेची मोठी भेट!

राज्य शासनाने याबाबतचा अध्यादेश आज काढला. त्यानुसार नाशिक शहरात गट नं . १०५६ आणि १०५७/१ मधील ६० गुंठे शासकीय जमीन छत्रपती शाहूमहाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेचे विभागीय मुख्यालय नाशिक येथे सुरु करण्यासाठी नियोजन विभागास प्रदान करण्याचा आदेश काढला आहे.

Eknath Shinde & devendra Fadanvis
Shivsena; शिवसेनेचा नाशिक महापालिकेसाठी ‘हंड्रेड प्लस’चा नारा!

नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने याबाबतचा प्रस्ताव छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मागणीनुसार पाठवला होता. २२ मार्च २०२२ रोजी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांनी या संस्थेचे विभागीय मुख्यालय नाशिक येथे सुरू करण्यासाठी तसेच नाशिक विभागातील सर्व लक्षित गटातील लाभार्थ्यांना अभ्यासिका, मुला मुलींना वेग वेगळे वसतीगृह व इतर अनुषंगिक प्रयोजनांसाठी जागेची मागणी केली होती.

संस्थेच्या मागणीच्या अनुषंगाने नाशिक येथील सहा हजार चौरस मीटर जागा शासकीय जमीन भोगवटादार वर्ग -२ या धारणाधिकारावर महसूल मुक्त पध्दतीने मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदरची जागा सारथी संस्थेस देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यानुषंगाने २ मार्च २०२२ च्या बैठकीमधील निर्णयानुसार कार्यपद्धती करण्यात आली आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in