Maratha News : मराठा आरक्षणासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत!

State Government should take serious steps for Maratha reservation-रावेर (जळगाव) येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे राज्य सरकारला आवाहन
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

Balasaheb Thorat On Maratha reservation : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. त्यासाठी विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रश्न गांभिर्याने घ्यावा, असे आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. (Balasaheb Thorat given support to Maratha agitation & Deemands)

मराठा (Maratha) आरक्षणासाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्यामुळे राज्य (Maharashtra) सरकारने त्याबाबत गांभिर्यांने पावले टाकावीत, असे आवाहन काँग्रेस (Congress) नेते थोरात यांनी केले.

Balasaheb Thorat
Chhagan Bhujbal News : `ओबीसी`साठी लवकरच सावित्रीबाई फुले आधार योजना!

सावदा (ता. रावेर) येथे काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. थोरात म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या या प्रश्नावर राज्याच्या विविध भागात आंदोलन सुरू आहे. समाजातील विविध घटक याबाबत अतिशय गंभीर आहेत. विशेषतः मराठा समाजातील गरीब वर्गाला त्याबाबत अपेक्षा आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्याचा गांभिर्याने विचार करावा.

इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत सर्व घटक अतिशय सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यात काहीही अडचणी येणार नाहीत. त्याबाबत सर्वच नेत्यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचा पराभव हा सर्वांचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न झाल्यास आम्हीही सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
CM Eknath Shinde Tour At Jalna : भुमरे- खोतकरही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून अनभिज्ञ..

रावेर लोकसभेची जागा काँग्रेसची असून, काँग्रेसचाच उमेदवार देण्याचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात काँग्रेस २४ जागा लढण्यासाठी मित्रपक्षांशी चर्चा सुरू होती. याबाबत सामंजस्याने तोडगा निघाला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्ते एकदिलाने विजयासाठी काम करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in