जळगावची विमानसेवा केव्हा घेईल भरारी!

विमानसेवा बंदमुळे मुंबईत जाणाऱ्या उद्योजक-व्यापाऱ्यांचे होतेय गैरसोय
Jalgaon air service
Jalgaon air serviceSarkarnama

जळगाव : सुमारे सात महिन्यांहून (Air service) अधिक काळ बंद असलेली जळगावची (Jalgaon) विमानसेवा अद्यापही सुरू होऊ न शकल्याने उद्योजक (Industry) व व्यापाऱ्यांचे मुंबईला (Mumbai) जाण्यासाठी हाल होत असून, ती त्वरित सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांना विमानसेवेने जोडण्याचा उपक्रम त्यामुळे बंद पडतो की काय याची चिंता आहे. राजीकय नेते याबाबत केव्हा जागे होणार असा प्रश्न विचारसा जात आहे.(Jalgaon air service is down from last seven months)

Jalgaon air service
सोशल मीडियावरील पोस्टचा राग आल्याने राडा, परिस्थिती नियंत्रणात

जळगाव जिल्ह्यातील विविध संस्था, पदांवर भाजपचे नेते सत्तेत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांसह विविध आमदार तसेच दोन्ही खासदार याच पक्षाचे असल्याने ते विमानसेवेबाबत गांभिर्याने विचार करतील का, हा प्रश्न आहे.

Jalgaon air service
RTI ACT; धुळ्यात टोळी सक्रीय, थेट पैशांची होतेय मागणी

विमानसेवा सुरू होण्याबाबत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून जळगावचा विमानतळ बांधण्यात आला आहे. तत्कालीन राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विमानतळाचे उद्‍घाटन झाले होते. मात्र या ना त्या कारणामुळे विमानसेवा खंडित होत आहे.

विमानसेवेमुळे जळगावचे नाव देशपातळीवर नोंदविले गेले होते. विमानाने काही तासांतच देशाच्या कान्याकोपऱ्यात पोचू, असा विश्वास येथील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील, अभियंते व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत होता. मात्र काही महिने सुरू सेवा सुरू होती. नंतर त्यात अनेक कारणांनी ती बंद पडली आहे. आता तर गेल्या सात महिन्यांपासून सेवा बंदच आहे. त्यामुळे शासनाने विमानतळावर केलेला कोट्यवधीचा खर्च वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

मार्च महिन्यापासून जळगावची विमानसेवा बंद असल्यामुळे, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तीन वर्षांपूर्वी उडान योजनेंतर्गत हैदराबाद येथील ट्रूजेट या विमान कंपनीने जळगावची विमानसेवा सुरू केली होती. अपेक्षित प्रवासीसंख्या मिळत नसल्यामुळे आर्थिक तोटा झाल्याचे सांगत, विमान कंपनीने जळगावची विमानसेवा बंद केली आहे. ट्रूजेटचे ७५ टक्के भागभांडवल विन एअर या परदेशी कंपनीने विकत घेऊन, जळगावची सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र या कंपनीने ट्रूजेटला ठरलेल्या भागभांडवलापैकी एकही रुपया न दिल्याने, ट्रूजेटने विन एअर कंपनीकडे कोठलीही सेवा वर्ग केली नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जळगावची विमानसेवा उडान योजनेची दिल्लीतील बैठक होईपर्यंत बंदच राहू शकते.

जळगाव विमानसेवेचा रूट हा उडान योजनेंतर्गत विमानसेवा चालविण्यासाठी मंजूर झाला आहे. दिल्लीला उडान योजनेची बैठक होणार आहे. त्यात जळगावच्या विमानसेवेबाबत चर्चा होईल.

रोझी रवींद्रन, संचालक, जळगाव विमानतळ

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com