FOXCON: राज्य सरकार गुजरातची चाकरी करणारे मोदी- शहांचे हस्तक!

केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ सटाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
Sanjay Chavan
Sanjay ChavanSarkarnama

सटाणा : कांद्याला उत्पादन (Onion) खर्चापेक्षा कमी दर मिळत असताना केंद्र (Centre) आणि राज्य सरकारचे (State Government) याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. गुजरातची (Gujrat) चाकरी आणि मोदी- शहांचे हस्तक (Underling) म्हणून काम करणाऱ्या राज्यातील शिंदे- फडणवीस (Shinde-Fadanvis Government) सरकारच्या नाकर्तेपणामुळे वेदांत समुहाचा मोठा रोजगार देणारा औद्योगिक प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील बेरोजगारीत मोठी वाढ होईल, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार संजय चव्हाण (Sanjay Chavan) यांनी केला. (Maharashtra Government working in the interest of Gujrat)

Sanjay Chavan
एकनाथ शिंदे अन् त्यांनी फोडलेल्या नगरसेवकांचा फैसला एकाच दिवशी?

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसह शेतकऱ्‍यांची बिनशर्त माफी मागावी आणि कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावे.

Sanjay Chavan
NCP News: एकनाथ शिंदे सरकारने महाराष्ट्राला धोका दिला

राज्यातील शेतकरी, युवकांसह विविध प्रलंबित प्रश्‍नांसाठी सटाणा शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येथील बसस्थानकासमोरील साक्री- शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर उत्स्फूर्त रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.

सकाळी दहाला राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली. महामार्गावर कांदा, टोमॅटो फेकून ठिय्या दिला. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती.

श्री. चव्हाण म्हणाले, पावसामुळे शेतकऱ्‍यांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाकडून कुठेही पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांद्याला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्‍यांना मातीमोल दराने कांदा विकावा लागत आहे. शिंदे- फडणवीस सरकारने शेतकऱ्‍यांच्या तोंडाला पाने पुसून त्यांना वाऱ्‍यावर सोडले आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये एकरी नुकसानभरपाई द्यावी.

माजी आमदार दीपिका चव्हाण म्हणाल्या, वेदांता- फॉक्सकॉन या औद्योगिक प्रकल्पामुळे राज्यात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि दीड ते दोन लाख रोजगारही निर्माण झाले असते. मात्र, हा प्रकल्प गुजरातकडे जाण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत.

आंदोलनात माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, विजय वाघ, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, बाजार समिती संचालक केशव मांडवडे, संजय बिरारी, अनिल चव्हाण, अॅड. रेखा शिंदे, सुरेखा बच्छाव, वंदना भामरे, गायत्री कापडणीस, जिभाऊ सोनवणे, संजय वाघ शिरसमणीकर, वसंत भामरे, झिप्रू सोनवणे आदींसह शेतकरी व कार्यकर्ते सहभागी होते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in