शिवसेनेने पुढाकार घेतला अन् तासगाव आगारातून धावली लालपरी

एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
शिवसेनेने पुढाकार घेतला अन् तासगाव आगारातून धावली लालपरी
ST Strikesarkarnama

सांगली : राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरू आहे. सरकारकडून कामावर रुजू होण्याचे वारंवार आवाहन करून २५० आगारांमध्ये संप कायम आहे. त्यामुळे एसटीची सेवा सुरू करण्यासाठी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. स्थानिक आगारांमध्ये जाऊन संपकऱ्यांशी आणि प्रशासनाशी चर्चा करण्याचेही सांगितले होते. त्यानुसार तासगाव आगारातून शिवसेना तासगावच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली व तासगाव सांगली, तासगाव मिरज, तासगाव विटा या मार्गावर नारळ फोडून एसटी सुरू केली. शिवसेना (Shiv Sena) शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे शिष्टमंडळ सकाळी आंदोलन स्थळी पोहोचले.

ST Strike
बैल कितीही आडमूठ असला तरी शेतकरी आपले शेत नांगरतोच; संजय राऊतांचा मोदींना टोला

प्रवाशांचे हाल आणि दैनंदिन तोटा वाढत असल्याने संप मोडण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु केल्या होत्या. संप मोडण्यासाठी शिवसेना स्टाईलचा वापर करणार असल्याचे सांगितले जात होते. त्याचा प्रत्यय आज आला. शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर तासगाव आगारातून एसटी धावली.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीय या प्रति सहानुभूती व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या कर्मचारी संपादरम्यान काही राजकीय पुढारी जाणीवपूर्वक राजकीय भांडवल करून दुकानदारी करीत आहेत. या मुळे कर्मचाऱ्यांची दिशाभूल होत असून कर्माचार्‍यांनी आडमुठे पणाची भुमिका न घेता कामावर हजर व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ST Strike
ठाकरे सरकार झाले कठोर : संप मिटला नाही तर ST चे खासगीकरण

या वेळी शिवसेना शेतकरी प्रतिनिधी संदीप गिड्डे पाटील, तालुकाप्रमुख प्रदीप पाटील, तालुका संघटक जयवंत माळी, महिला आघाडी विधानसभा प्रमुख शोभाताई पिसाळ, युवासेना तालुकाप्रमुख नितीन राजमाने, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषाताई पाटोळे, शहरप्रमुख विशाल शिंदे, युवासेना उपतालुकाप्रमुख अनिल दौंड. चिटनीस सुशांत यादव, प्रशांत गुंजले, प्रमोद सावंत, नितीन बाबर, तुषार धाबुगडे, केशव वाघमोडे, चिंतामणी यादव, आगारप्रमुख विरेंद्र होनराव, स्थानक प्रमुख सुनंदा देसाई, सहायक वाहतूक निरीक्षक राजू जाधव, सतिश पाटील, सुतार, फोंडे, सतिश पाटील, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव तरटे यांचेसह एसटी चालक वाहक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in