एसटीचे विलीनीकरण धुसर झाल्याने कर्मचारी अस्वस्थ?

अल्टिमेटमनंतर कर्मचारी रूजू होऊ लागले; प्रशासनाने दिली गुरुवारपर्यंत मुदत.
State Transport corporation buses
State Transport corporation busesSarkarnama

नाशिक : शासकीय सेवेत एसटी (ST) महामंडळाचे विलीनीकरण अशक्‍य असल्‍याचे समितीचे म्‍हणणे स्‍पष्ट करतानाच परिवहनमंत्री ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना (Employee) कामावर परतण्याचे आवाहन केले होते. त्‍यासाठी गुरुवार पर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे.

State Transport corporation buses
जयंत पाटील सिद्धार्थ कांबळेंच्या केसांच्या फुग्यावर हात फिरवतात तेव्हा!

या पार्श्‍वभूमीवर नाशिक विभागातील वीस कर्मचारी कामावर रुजू झाले. तसेच, येत्‍या तीन-चार दिवसांत आणखी काही कर्मचारी रुजू होण्याची शक्‍यता बळावली आहे. मात्र रूजू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यात वाढ व्हावी अेस प्रयत्न सुरु आहेत. आता न्यायालय व राज्य शासनाची भूमिका स्पष्ट झाल्याने विलीनीकरणाची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे या विषयावर कर्मचाऱ्यांना आश्वासने दिलेल्या नेत्यांची अडचण झाली आहे. तर कर्मचाऱ्यांनी हा विषय भावनिक केल्याने ते अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. ज्या विषयासाठी संप एव्हढे दिवस लांबवला, त्याचे काय होणार? अशी द्वीधा अवस्था व्यक्त होऊ लागली आहे.

State Transport corporation buses
रेल्वे, विमाने गेली, आता `बीएसएनएल`तरी वाचवा!

एसटी महामंडळाचे अनेक कर्मचारी अद्याप कामावर परतलेले नसल्‍याने सध्या तरी एसटी बससेवा पूर्वपदावर येऊ शकलेली नाही. परंतु खासगी स्‍वरूपातील कंत्राटी चालक व अन्‍य वेगवेगळ्या प्रयत्‍नांतून बससंख्या व बसफेऱ्यांची संख्या वाढलेली आहे. संपकरी कर्मचारी अहवालाच्‍या प्रतीक्षेत असल्‍याने ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतलेली होती. अशात विलीनीकरण अशक्‍य असल्‍याची स्‍पष्टोक्‍ती देताना मंत्री परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. कारवाई मागे घेण्याचेही जाहीर केले होते. त्‍यास प्रतिसाद देत शनिवारी नाशिक विभागातील २० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. रविवारी कार्यालयास सुटी होती. आज आणखी काही प्रमाणात कर्मचारी रुजू होण्याची शक्‍यता आहे.

संपकऱ्यांचा नकार

दरम्यान, एकूणच परिस्थितीच्या अनुषंगाने नाशिक विभागातील संपकरी कर्मचाऱ्यांची द्वारसभा झाली. या वेळी अनेक संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर न परतण्याचे जाहीर केले. मंत्र्यांचे आवाहन हे कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणारे असल्‍याचा दावा या वेळी करण्यात आला. सुनावणी प्रक्रिया पूर्ण होऊन न्‍याय मिळेपर्यंत संपात सहभागी राहणार असल्‍याचे या वेळी उपस्‍थित कर्मचाऱ्यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com