एसटी बंद, डेपो बंद, बसेसची तोडफोड.. कुठे चालला आहे हा संप?

एसटी कर्मचाऱ्यांकडून सामान्यांची सहानुभूती गमावण्याची भिती
ST Employees Strike

ST Employees Strike

Sarkarnama

नाशिक : आंदोलक कर्मचारी कामावर रुजू झाल्‍यास निलंबन मागे घेण्याची घोषणा परिवहनमंत्री (Transport Minister) अनिल परब (Anil Parab) यांनी केली होती. त्यालाही कर्मचाऱ्यांनी दाद दिलेली नाही. महामंडळ बंद, डेपो बंद आणि बसेस रस्त्यावर दिसल्या की तोडफोड हे चित्र आहे. ज्या बसेसवर महामंडळ व कर्मचाऱ्यांचे पोट त्याचीच तोडफोड होत असेल, तर त्यात सामान्यांची सहानुभूती कर्मचाऱ्यांना राहील का असा प्रश्न विचारला जातो आहे.

<div class="paragraphs"><p>ST Employees Strike</p></div>
`एसटी`चे व्यावस्थापन खाजगी तज्ञांच्या हातात देणे आवश्यक!

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी फलकबाजीतून मंत्र्यांचा प्रस्‍ताव धुडकावला आहे. ‘वो बुलाता है, मगर जाने का नहीं... लॉलीपॉप देगा मगर खाने का नाही’ असा संदेश फलकावर लिहिण्यात आला. या फलकावरील संदेश कर्मचाऱ्यांनी उलटा तर घेतलेला नाही ना? असा प्रश्न पडू लागला आहे. गेल्‍या ३८ दिवसांपासून एसटी कर्मचारी अघोषित संपावर ठाम आहेत. संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनातर्फे अनेक प्रयत्‍न झाले. निलंबन, सेवासमाप्ती, बदल्यांतून दबावतंत्राचाही वापर करण्यात आला. मात्र आंदोलक कर्मचाऱ्यांवर कुठलाही प्रभाव पडत नसल्‍याची सध्याची स्‍थिती आहे. कामावर हजर होण्यासाठी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री परब यांनी सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिलेला होता. गेल्या तीन दिवसांत १८ संपकरी सेवेत दाखल झाल्‍याची माहिती मिळते आहे, तर नाशिक विभागातील पाच हजार २९४ कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ७७२ कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत. कामावर हजर झालेल्‍यांमध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असून, चालक-वाहकंचे प्रमाण अत्‍यल्‍प आहे. त्‍यातच फलकबाजी करताना कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे.

<div class="paragraphs"><p>ST Employees Strike</p></div>
भाजप आमदार सावकारे म्हणतात, `मुझे पहचानो, मै हू डॉन...!`

सोमवारी नाशिक विभागातून एकूण ४७ बसगाड्या सोडण्यात आल्‍या. यात नाशिकहून २५ खासगी शिवशाहींचा समावेश होता. येवला आगारातून ११, लासलगाव आगारातून सात, पिंपळगाव बसवंत आगारातून चार बसगाड्या सोडल्‍या. अन्‍य आगारातील बससेवा ठप्प होती.

शिवशाही, लालपरीची तोडफोड

दरम्‍यान, तुरळक प्रमाणात रस्‍त्‍यावर असलेल्‍या शिवशाही, लालपरीची तोडफोड केल्‍याच्‍या घटना समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत एसटी बसगाड्यांवर दगडफेकीच्‍या घटना वाढल्‍या आहेत. रविवारी (ता. १२) औरंगाबाद महामार्गावर दोन बसगाड्यांवर दुचाकीस्‍वारांनी दगडफेक केली. सोमवारी (ता. १३) खासगी शिवशाहीवर दगडफेक झाल्‍याची घटना उघडकीस आली.

आता थेट बडतर्फी

मंत्र्यांनी दिलेली मुदत संपल्‍याने प्रशासन आता कठोर कारवाईच्‍या भूमिकेत आलेले आहे. कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मंगळवार (ता. १४)पासून बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्‍याचे समजते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com