ST Strike; आज हेकेखोर संपकरी कर्मचाऱ्यांचे मार्ग बंद होणार?

संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत प्रशासन आक्रमक भूमिकेत.
ST Strike
ST StrikeSarkarnama

नाशिक : एसटी (MSRTC) महामंडळाचे संपकरी कर्मचारी आत्तापर्यंत आक्रमक पवित्र्यात होते. त्यामुळे वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद न देणाऱ्‍या संपकरी (State Government) कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरूच आहे. येत्‍या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी बडतर्फ केले जाणार आहेत. निवृत्त वाहकांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍तीच्‍या हालचाली गतिमान झाल्‍या असल्‍याने संपकरी कर्मचाऱ्यांचे सर्व मार्ग बंद होण्याची शक्‍यता आहे.

ST Strike
देशात कुठेही झाले नाही ते नाशिककरांनी करून दाखविले!

विलिनीकरणाच्या मुद्यावर संपकरी कर्मचारी ठाम असून, राज्‍यस्‍तरावर आंदोलनाची धग कायम आहे. अशात तुरळक प्रमाणात कर्मचारी कामावर परतत आहेत. याशिवाय खासगी शिवशाहीच्‍या माध्यमातून प्रवासी वाहतुतूक काही दिवसांपासून केली जात आहे. यादरम्‍यान कारवाई मागे घेण्याचे आश्‍वासन देतानाच परिवहनमंत्री अनिल परब यांनी कामावर परतण्याचे आवाहन संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले होते. तरीदेखील कर्मचारी संपावर ठाम असल्‍याने बडतर्फीची कारवाई करण्याबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडून सूचना जारी केल्‍या होत्‍या. अशात उच्च न्यायालयाच्‍या सुनावणीची तारीख पुढे ढकलली जात असल्‍याने संपकरी कर्मचाऱ्यांची चिंता वाढत आहे.

ST Strike
स्थानिकांसाठी २५ टक्के पाणी आरक्षीत करण्याच्या सूचना!

नाशिक विभागांतर्गत आतापर्यंत ९५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. साडेचारशेहून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर उत्‍पन्न घटल्‍याच्‍या कारणास्‍तव अनेक संपकरी कर्मचाऱ्यांवर खातेअंतर्गत आरोपपत्र निश्‍चित केले जात आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीसह नियमित कर्मचाऱ्यांच्या बदल्‍यांचाही धडाका काही दिवसांपूर्वी लावला होता. यादरम्यान, नाशिक विभागात टप्प्‍याटप्प्‍याने २५ टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्‍यामुळे तेरापैकी दहा आगारांतून अत्‍यल्‍प स्‍वरूपात का होईना बससेवा सुरू आहे. कारवाईचा धसका घेतलेल्‍या काही कर्मचाऱ्यांकडून कामावर हजर होण्यासंदर्भात विचारणा केली जात आहे. परंतु कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्‍याचे सांगण्यात येत आहे. आणखी एक पाऊल पुढे टाकत नजीकच्‍या काळात निवृत्त झालेले चालक, कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्‍धतेची चाचपणी केली जात आहे.

पहिल्‍या टप्प्‍यात पन्नास कर्मचारी

नुकतीच महामंडळातर्फे निवृत्त चालक, कंत्राटदारांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पार्श्‍वभूमीवर नाशिक विभागात सुमारे पंचवीस चालकांनी सेवेत दाखल होण्यासाठी अर्ज केले आहेत. आज या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी व अन्‍य प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्‍यस्‍तरावर कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरविण्याचे धोरण आखले आहे. त्‍यानुसार पहिल्‍या टप्प्‍यात नाशिक विभागाला ५० कंत्राटी कर्मचारी मिळण्याची शक्‍यता आहे. या दोन्‍ही माध्यमातून उपलब्‍ध होणाऱ्या मनुष्यबळामुळे एसटी प्रशासनाला सेवेची व्‍याप्ती वाढविण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे दरवाजे बंद होण्याची शक्‍यता आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com