Dhule News: धुळे महापालिकेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा; व्यवस्थापकाला मारहाण करत काळे फासले

Dhule Municipal Corporation : या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation Sarkarnama

NCP News : धुळे महापालिकेत तुफान राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी शहरातील कचरा संकलन करणाऱ्या एका ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला मारहाण केली. या प्रकारामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

व्यवस्थापकाला काळे फासत अंडी फेकून मारहाण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर महापालिकेत काही वेळ तणावाचे वातवरण पाहायला मिळाले.

Dhule Municipal Corporation
Solapur Bjp News : उदय पाटलांनी भाजपत प्रवेश केला अन्‌ सुभाष देशमुखांनी त्यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

नेमकं काय घडलं?

धुळे महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील रोज स्वच्छता होत नाही. वेळेवर शहरातील कचरा उचलला जात नाही. असा आरोप राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आला. तसेच या विरोधात आंदोलन करण्यात आलं.

Dhule Municipal Corporation
Maharashtra : महाराष्ट्रातील उद्योगांपाठोपाठ घरकुलेही राज्याबाहेर जाणार, दानवेंनी व्यक्त केली भीती !

या आंदोलनादरम्यान, ठेकेदाराच्या व्यवस्थापकाशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शाब्दिक चकमक झाली. यावेळी व्यवस्थापकाने अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि व्यवस्थापकाला मारहाण केली. तसेच व्यवस्थापकाला काळे फासत अंडी फेकून मारली. या प्रकारामुळे महापालिकेत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in