Congress; भारत जोडो यात्रेच्या यशात सोशल मीडिया महत्त्वाचा!

सोशल मीडिया हाच आगामी राजकारणातील गेम चेंजर असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Congres social media meeting
Congres social media meetingSarkarnama

नाशिक : काँग्रेस (Congress) पक्षाचा सोशल मीडिया विभाग (Social Media) आगामी आपली नाशिक महापालिकेची (NMC) निवडणूक असो नाही अथवा राज्यातील विधानसभा (Assembly elections) किंवा केंद्रातील लोकसभा (Loksabha) असो यासाठी गेम चेंजर असणार आहे. आगामी काळात सोशल मीडिया अधिक समृद्ध होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर (Sharad Aher) यांनी केले. (Congress social media office bearers meeting in Nashik city)

Congres social media meeting
`सीईओ`च्या आदेशाने `जिप` कर्मचाऱ्यांची झोप उडाली

देशातील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाच्या बाजूने वातावरण अनुकूल करण्यात भारत जोडो यात्रे बरोबर सोशल मीडियाचा फार मोठा वाटा असणार आहे. एका दृष्टीने बघितले तर आपल्याला निट समजते इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या बरोबर नाही पत्रकार बांधव जरी आपली बातमी दाखवायचं ठरवलं तरी यंत्रणा बातमी प्रसिद्ध करू देत नाही.

Congres social media meeting
Shocking: एसपी सचिन पाटील, मनसे नेते प्रदीप पवार यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

सध्याच्या वातावरणात सुध्दा भारत जोडो यात्रेच थेट प्रक्षेपण किंवा फोटो आपल्याला सोशल मीडियावर दिसल. इथून पुढे पण दिसेल भारत जोडो यात्रा यशस्वी पणे महाराष्ट्राच्या घराघरात-मनामनात पोहचवण्याच काम सोशल मीडिया वॉरियरने यशस्वी करून दाखवले. इथून पुढे सर्व निवडणुका आपल्याला जमिनीस्तराबरोबरच सोशल मीडियाच्याच माध्यमातून लढता येतील हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाशिक शहर व जिल्हास्तरीय काँग्रेस सोशल मीडियाची बैठक काँग्रेस भवन येथे झाली. या वेळी प्रदेश पदाधिकारी सुरेश मारू, प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर काळे, राज्याचे सोशल मीडिया समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हाध्यक्ष निरंजन आहेर, शहराध्यक्ष सुदेश अण्णा मोरे, प्रदेशचे डॉ. अमृत सोनवणे, पूर्वचे अध्यक्ष उमेश दासवणी, दिनेश जाधव, आकाश घोलप, महेश एलमामे, मुजाहिद खतीब, निलेश शेवाळे, सुरेश कांकरेंज, अॅड. समीर देशमुख, समाधान जामदार, अमोल मरसाळे, प्रवीण काटे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com