सोशल माध्यमे घातक बनलीय, त्यावर लक्ष ठेवा!
MLA Rajesh PadviSarkarnama

सोशल माध्यमे घातक बनलीय, त्यावर लक्ष ठेवा!

तळोदा येथे शांकका समितीच्या बैठकीत आमदार राजेश पाडवी यांनी प्रशासनाला सुचना केल्या.

तळोदा : सोशल मीडिया (Social Media) खूपच घातक झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या घटनांबद्दल आधी नागरिकांनी त्यातील तथ्य, सत्यता याची पडताळणी केली पाहिजे. सोशल मीडियावर कंट्रोल आणणे आवश्यक आहे. तसेच समाज कंटक यांना कुठलीच जात - धर्म नसते. सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक शांतता प्रस्थापित करु शकतात असे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी (Rajesh Padvi) यांनी केले. (MLA Rajesh Padvi alert police for social media Content)

MLA Rajesh Padvi
केंद्र सरकार अजित पवारांना एव्हढे का घाबरले?

तळोद्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी राजेश पाडवी बोलत होते.

आमदार पाडवी यांनी पोलिस तसेच नागरिकांना सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी झाला पाहिजे, ही सर्वांची अपेक्षा असते. मात्र तसे होताना दिसत नाही. सध्या काही घटक या अनियंत्रीत माध्यमाचा वाद-विवाद व सामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठी करू लागले आहेत. त्याची झळ समाजाला बसते. त्यामुळे याबाबत पोलिसांनी अतिशय बारीक लक्ष ठेवले पाहिजे. समाजकंटक व दोषींवर कडक कारवाई करावी.

MLA Rajesh Padvi
काँग्रेस नेता आता पेटलाय... मंत्री धडकले राजभवनावर

यावेळी पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा म्हणाले, वेगवेगळ्या अफवा व त्यानंतर तयार झालेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण समाज वेठीस धरले जातात व अशा परिस्थितीचा समाज कंटक फायदा घेतात असे सांगितले. तहसीलदार गिरीश वखारे म्हणाले, किरकोळ कारणांमुळे वातावरण दूषित होते. मात्र त्यामुळे गोरगरिबांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे शहरात कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी सर्वांनी मिळून काळजी घेणे आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले.

यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा, आत्मनिर्भर भारत अभियानचे कैलास चौधरी, नगरसेवक अमोनोद्दीन शेख, भाजपचे युवा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, केसरसिंग क्षत्रिय, निसार मक्राणी, पोलिस पाटील संघटनेचे बापू पाटील, आरिफ शेख नुरा, जालंधर भोई, विजय सोनवणे, राजाराम राणे, बबलू पिंजारी, बजरंग दलचे पदाधिकारी, विठ्ठलसिंग बागले, प्रवीण वळवी, किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in