
Nashik Graduate Constituency : बीडला रवाना होण्यापुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी आज (१५ जानेवारी) सकाळी शिर्डी विमानतळावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.या भेटीत नाशिक पदवीधर उमेदवारासंदर्भात चर्चा झाल्याची चर्चा आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
विखे-पाटील यांच्याशी खासगीत चर्चा झाल्यानंतर फडणवीस बीडला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाळासाहेब थोरात यांनी अनेकदा काँग्रेसच्या निष्ठा आणि इतर बाबतीत ज्ञान पाझळलं आहे. महाविकास आघाडीने आपला उमेदवार निश्चित केल्यावर बाळासाहेब थोरात यांनी त्या उमेदवाराची संगमनेरमध्ये जाहीर सभा घेतली पाहिजे, असा टोलाही विखे पाटलांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्याबद्दल विचारले असता विखे पाटील म्हणाले की,प्रत्येक उमेदवार आपापले पर्याय शोधत असतो. महाविकास आघाडीने त्यांच्यासाठी उमेदवार शोधला आहे. उद्या भाजपाने सत्यजित तांबेना (Satyajit Tambe) पाठिंबा दिला तर त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करु, असही विखे-पाटलांनी यावेळी सांगितलं
इतकेच नव्हे तर, पक्षाच्या विचाराशी फारकत घेऊन काँग्रेस (Congress) वाटचाल करत आहे. भारत जोडो यात्रा ही काँग्रेससाठी नाही तर खासदार राहुल गांधी यांच्यासाठीच आहे. यात्रेच्या माध्यमातून ते स्वतःची प्रतिमा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेच. महाराष्ट्रातही काँग्रेसची अशीच अवस्था आहे. सुजय विखे यांच्याप्रमाणे सत्यजित तांबेदेखील बाहेर पडतील, असा दावा विखे पाटलांनी यावेळी केला आहे. यातून नाशिक पदवीधरसाठी सत्यजित तांबे हेच भाजपचे (BJP) उमेदवार असतील, असेही संकेत दिले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.