खानदेशात सेनेला दुसरा धक्का : सहा नगरसेवक शिंदेंच्या गटात

Shivsena|Eknath Shinde : आज आम्ही सहा नगरसेवक असलो तरी अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत.
Shrikant Shinde & Jalgaon Shivsena Latest News
Shrikant Shinde & Jalgaon Shivsena Latest NewsSarkarnama

जळगाव : महापालिकेत भारतीय जनता पक्षातून (BJP) फुटून २७ नगरसेवकांनी शिवसेनेला (Shivsena) सत्तेसाठी साथ दिल्यामुळे शिवसेनेची सत्ता महापालिकेवर आली होती. आता त्यातील पाठींबा देणाऱ्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेची साथ सोडून बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ठाणे येथे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची भेट घेवून त्यांनी पाठींबाही व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रातून जळगावातील नगरसेवकांची ही पहिली फुट आहे. (Shrikant Shinde & Jalgaon Shivsena Latest News)

Shrikant Shinde & Jalgaon Shivsena Latest News
जळगावात गिरीश महाजन विरुद्ध गुलाबराव पाटील संघर्ष आता दिसणार...

जळगाव महापालिकेत भाजपामधून फुटून शिवसेनेला पाठींबा देणारे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, प्रतिभा देशमुख, ज्योती चव्हाण, रेश्‍मा काळे, चेतन सनकत व कार्यकर्ता हर्षल मावळे यांनी आज (ता.29 जून) शिंदे गटाला पाठींबा दिला असून ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदेंचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली व आपला पाठींबा दर्शवला. यावेळी त्यांच्या समवेत अबंरनाथ येथील नगरसेवक सुनील चौधरी उपस्थित होते.

Shrikant Shinde & Jalgaon Shivsena Latest News
शिवसेनेत पहिला उठाव कुणी केला हे बंडखोर आमदार गोगावलेंनी नाव घेऊनच सांगितले...

याबाबतीत नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही ज्यावेळी भाजपतून बाहेर पडलो त्यावेळी शिंदे यांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आम्ही आज सहा नगरसेवक असलो तरी फुटीर गटासह अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आम्ही खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. आमच्यावर अपात्रतेची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे आताही यापुढे आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. त्यावर खासदार शिंदेंनीही लक्ष देण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे ते म्हणाले.

शिंदे, पाटलांशी चर्चा

यावेळी एकनाथ शिंदे व गुलाबराव पाटील यांच्याशीही फोनवरून चर्चा झाल्याची माहिती दारकुंडे यांनी दिली, ते म्हणाले की गुलाबराव पाटीलांनी सांगितले की आपल्या अपात्रतेच्या बाबतीत आपण शिंदे यांच्याशी चर्चा करणार असून आपण स्वत: लक्ष देणार आहोत. दोन दिवस आपण मुबंईत थांबत असाल तर आपण भेट घेवू असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com