Shivsena: बंडखोर आमदाराच्या भगीनाने मातोश्रीवर दिली हजारो शपथपत्र

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना अखेर घरातूनच मोठे आव्हान मिळाल्याने पाटोऱ्याचे राजकारण रंगणार.
Vaishali Surywanshi with Uddhav Thakrey & Shivsena leaders.
Vaishali Surywanshi with Uddhav Thakrey & Shivsena leaders.Sarkarnama

पाचोरा : आमदार किशोर पाटील (Kishor Patil) शिवसेनेला (Shivsena) आव्हान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात दाखल झाले. मात्र त्यांना काल थेट घरातूनच मोठे आव्हान मिळाले. त्यांच्या भगीनी वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांनी काल शिवसेना पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हजारो शपथपत्र सादर केली. त्यामुळे आमदार पाटील यांच्या राजकारणाला धक्का बसला. (MLA Kishor patil get political shock by Matoshree)

Vaishali Surywanshi with Uddhav Thakrey & Shivsena leaders.
Shivsena: इगतपुरीच्या नगरसेविका सीमा जाधव अपात्र घोषित

माजी आमदार तथा निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक (स्व.) आर. ओ. (तात्या) पाटील यांची कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पर फलक लावून ठाकरे कुटुंबीय व मातोश्रीशी एकनिष्ठ असल्याचे जाहीर केल्यानंतर बुधवारी त्यांनी शेकडो शिवसैनिकांसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली व त्यांना हजारो शिवसैनिकांच्या सह्यांचे शपथपत्र सुपूर्द केले.

Vaishali Surywanshi with Uddhav Thakrey & Shivsena leaders.
NMC Election: प्रभागरचना बदलल्याने भाजप शिवसेनेला शह देणार?

वैशाली सूर्यवंशी यांनी आपले वडील (स्व.) आर. ओ. (तात्या) पाटील यांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार तसेच ठाकरे कुटुंबावर असलेल्या श्रद्धेच्या आधारे वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठाकरे कुटुंब व ‘मातोश्री’सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिंदे गटात सहभागी झालेले त्यांचे चुलत भाऊ आमदार किशोर पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.

वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात लावलेले शुभेच्छापर बॅनर अवघ्या दोन दिवसांत हटवण्यात आल्याने त्यांनी पाचोरा येथील शिवसेना कार्यालय देखील आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यांनी बुधवारी शेकडो शिवसैनिकांसह मातोश्री गाठली व उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यावर असलेली निष्ठा स्पष्ट करून सोबत असल्याची ग्वाही दिल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी शिवसैनिकांसह मुंबई येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन अभिवादन केले.

‘मातोश्री’वर हजारो शिवसैनिकांचे शपथपत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार नीलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार सचिन आहेर, अंबादास दानवे, रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, राजेंद्र साळुंखे, शेतकरी सेनेचे अरुण पाटील,, माजी नगरसेवक दत्ता जडे, भरत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, संदीप जैन, अजय पाटील, अनिल सावंत, भडगावचे लखीचंद पाटील, शंकर मारवाडी, जे. के. पाटील, दीपक पाटील, मच्छिंद्र पाटील, डॉ. योगेंद्रसिंह मौर्य, निर्मल सीड्सचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील, ॲड. नरेंद्रसिंग सूर्यवंशी, प्रमोद दळवी, रवी चोरपगार आदी उपस्थित होते.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर वैशाली सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले, की आर. ओ. तात्या असते तर असे काही घडलेच नसते. निदान या सर्व घटनांपासून पाचोरा तरी दूर राहिले असते व तात्या हे ठाकरे कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभे राहिले असते. त्यांची निष्ठा, शिकवण व वैचारिक आचरणाची जाण ठेवून त्यांची मुलगी म्हणून ठाकरे कुटुंबीय व ‘मातोश्री’सोबत पडतीच्या काळात खंबीरपणे उभे राहणे माझे कर्तव्य आहे. आमदार, खासदार निवडणुकीत उमेदवारी अथवा पदाच्या विचाराने मी हे करीत नसून ज्या ठाकरेंच्या पुण्याइने तात्या आमदार झाले, त्यांना पडतीच्या काळात साथ देणे हाच एकमेव उद्देश असल्याचे वैशाली सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

वैशाली सूर्यवंशी यांच्या एकूणच या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात साधक बाधक चर्चा, प्रतिचर्चा, प्रतिक्रिया यांना उधाण आले असून त्यामुळे राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्र आहे.

----------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com