सिन्नरचा पहिला लेफ्टनंट अनिकेतची महिलांनी काढली मिरवणूक!

लेफ्टनंट अनिकेत चव्हाणके यांचे सिन्नरला उत्साहात स्वागत झाले.
Lieutenant Aniket Chavanke News, Nashik Latest Marathi News Updates, Sinnar News
Lieutenant Aniket Chavanke News, Nashik Latest Marathi News Updates, Sinnar NewsSarkarnama

सिन्नर : येथील (Sinner) अनिकेत चव्हाणके (Aniket Chavanke) यांची भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी निवड झाली. त्याचा सबंध गावाने आनंद साजरा केला. लेफ्टनंट अनिकेत यांचा सत्कार करण्यात आला. या पदावर पोहोचलेले ते तालुक्यातील एकमेव आहेत. त्यामुळे बसस्थानक परिसरातून सिन्नरकरांनी त्यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली. (Lieutenant Aniket Chavanke welcome by people)

Lieutenant Aniket Chavanke News, Nashik Latest Marathi News Updates, Sinnar News
आमदार कुणाल पाटील यांचा भाजपला `जोर का झटका`

बसस्थानकाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण केल्यानंतर लेफ्टनंट अनिकेत यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. श्री. चव्हाणके यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. महात्मा फुलेंच्या पुतळ्यापासून चव्हाणके यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी मिरवणुकीचा समारोप झाला. मार्गावर महिलांनी रांगोळी काढली. औक्षण केले. मित्र परिवाराने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. (Nashik Latest Marathi News)

Lieutenant Aniket Chavanke News, Nashik Latest Marathi News Updates, Sinnar News
एकनाथ खडसेंच्या विजयाने तापी खोऱ्यात ‘दिवाळी’

लेफ्टनंट अनिकेत यांचे वडील मुकेश चव्हाणके हे जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त विकास अधिकारी आहेत. आई लता चव्हाणके गृहिणी आहेत. काकू सुलोचना चव्हाणके पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नाशिक व सिन्नर येथील सायकलिस्ट ग्रुपचे पदाधिकारी, ढग्या डोंगर ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य, विविध सेवाभावी संघटनांसह राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

लेफ्टनंट पदापर्यंतचा प्रवास

अनिकेत यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नरच्या नवजीवन स्कूलमध्ये झाले. दहावीपर्यंत नाशिक येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे एनडीएची तयारी केली. एनडीएसाठी निवड झाल्यानंतर पुणे येथे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर डेहराडून येथे एक वर्षाच्या सैन्य दलाचे प्रशिक्षणानंतर त्यांची लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील सोलन येथे नियुक्ती झाल्याचे त्यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in