Breaking; शुभांगी पाटील यांच्यासाठी मुंबईतून 25 नगरसेवकांसह शंभर जणांची रसद!

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून शंभरहून अधिक निवडणूक प्लॅनरची कुमक प्रचारासाठी येणार.
Uddhav Thackrey & Shubhangi Patil
Uddhav Thackrey & Shubhangi PatilSarkarnama

नाशिक : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता चांगलीच रंगत येणार आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार व शिवसेनेने (Shivsena) पुढाकार घेऊन दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारासाठी मुंबईतील (Mumbai) शिवसेनेच्या कोअर टीममधील शंभर सहकारी सहभागी होणार आहे. ही अनुभवी मंडळी प्रचार व मतदानाची यंत्रणा गतीमान करतील. (Mahavikas Aghadi`s Candidate will speed up campaign in Nashik)

Uddhav Thackrey & Shubhangi Patil
ZP Road Theft; चोरीला गेलेला रस्ता सापडेना, अभियंता त्रस्त!

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार व काँग्रेसने बडतर्फे केलेले डॉ. सुधीर तांबे सध्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना प्रबळ आव्हान निर्माण करण्यासाठी शिवसेनेने लक्ष घातले आहे. त्यासाठी निवडणुका जिंकण्याचा दिर्घ अनुभव असलेले मुंबईचे शंभर तज्ञ कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचाराची धुरा हाती घेणार आहेत.

Uddhav Thackrey & Shubhangi Patil
BHR Scam; ‘बीएचआर’ पतसंस्थेच्या अवसायकांची उचलबांगडी होणार?

यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांनी नियोजन केले आहे. त्यासाठी मुंबईतील २५ नगरसेवकांसह १०० पदाधिकारी नाशिक पदवीधर मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. शिवसेना पुरस्कृत शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाने ही खास रणनिती आखली आहे. त्यांचा हा निर्णय मतदारसंघातील वातावरण बदलून टाकेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

येत्या २३ तारखेची षण्मुखानंद येथील सभा संपल्यानंतर २४ तारखेपासून संबंधित पदाधिकारी नाशिककडे रवाना होणार आहेत. प्रत्येक पदाधिका-याकडे प्रचार व नियोजनासाठी विभाग वाटून दिले आहेत. स्थानिक पदाधिका-यांच्या सोबतीने ते प्रचार करणार आहेत.

महाविकास आघाडीतर्फे आज शुभांगी पाटील यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या प्रचारार्थ यापूर्वी नाशिकला बैठक झाली. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यात शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, सचिव विनायक राऊत, नेते खासदार अरविंद सावंत, उमेदवार श्रीमती पाटील, शिवसेनेचे पाचही जिल्हाप्रमुख आणि आमदार, माजी आमदार, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, काँग्रेसच्या हेमलता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड आदी महाविकास आघाडी नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com