Sanjay Raut News; शुंभागी पाटील दबावापुढे झुकल्या नाहीत!

शुंभागी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याने प्रचाराला लागण्याचे आवाहन संजय राऊत यांनी केले.
Sanjay Raut & Shubhangi Patil
Sanjay Raut & Shubhangi PatilSarkarnama

धुळे : (Dhule) नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा जे घडले त्याचा लाभ महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारालाच होईल. मतदार शिक्षीत आणि सुज्ञ आहेत. शिवसेनेने (Shivsena) उमेदवारी जाहीर केलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार आता. कार्यकर्त्यांनी झोकून देऊन त्यांच्या प्रचाराला लागावे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. (Voters are educated and wise they will vote correctly to Mahavikas Aghadi candidate only)

Sanjay Raut & Shubhangi Patil
Saroj Ahire News: अमेरिकावारी करणाऱ्या तहसीलदार अहिरराव यांच्यावर गंभीर आरोप!

खासदार संजय राऊत यांनी धुळे येथील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक मुंबईत घेतली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पदवीधर निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

Sanjay Raut & Shubhangi Patil
Uddhav Thackrey News; भाजपला झटका, अस्लम मणियार, मदन डेमसे शिवसेनेत

यावेळी खासदार राऊत म्हणाले, शुभांगी पाटील या उच्च विद्याविभूषित, वेगवेगळ्या क्षेत्रात विविध पदविका प्राप्त करून, पदवीधर तसेच शिक्षकांच्या प्रश्नावर आक्रमकपणे आदोंलन करणाऱ्या, गेल्या अनेक वर्षांपासून पदवीधारकांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आपला आवाज बुलंद केला आहे.

शुभांगी पाटील याच नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाच्या च्या उमेदवार आहेत. शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रचारात कुठलीच कसर न सोडता झोकून देऊन प्रचाराला लागावे असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.

धुळे जिल्ह्य़ातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. मतदारसंघातील उमेदवारीबाबत काल प्रचंड घडामोडी घडत असतांना नाशिक येथील अनेक पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांनी काल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यावेळी खासदार राऊत यांनी मातोश्रीवर नाशिक येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. धुळे जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांची बैठक दैनिक सामनाच्या कार्यालयात पार पडली.

यावेळी राऊत यांनी धुळे जिल्ह्य़ातील शिवसेनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी सदस्य नोंदणी, नवीन मतदार नोंदणी अभियानाविषयी माहीती देऊन जिल्हयात ४५००० सदस्य नोंदणी झाल्याचे सांगितले. सर्व नविन सदस्य नोंदणी अर्ज शिवसेना भवन येथे जमा केले आहेत. महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन यांनी धुळे महानगरातर्फे केलेल्या कामाचा व आंदोलनाबाबत माहीती दिली.

शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे यांनी पदवीधर मतदारसंघातील सर्व सुक्ष्म बाबी चर्चेत मांडल्या. याप्रसंगी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी जिल्हाप्रमुख भूपेंद्र लहामगे उपस्थित होते.

दबावाला झुगारले!

महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यावर माघारीच्या दिवशी प्रचंड दबाव होता. अनेक प्रकारे त्यांना त्रास दिला जात होता. मात्र त्यांनी या सगल्या प्रकाराला सामोरे जात मागे हटल्या नाही. त्यामुळे प्रस्थापितांचे धाबे दणालले आहे. त्यामुळे मतदारसंघातील नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार येथील पदाधिकाऱ्यांना लवकरच प्रचाराची धुरा हाती घेऊन, विरोधकांना धडा शिवकावा, असे आदेश राऊत यांनी संबंधितांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com