Shivsena News; गद्दारांनो, शाखांना हात लावाल तर फडशा पाडू!

शिवसेना महिला आघाडीच्या नवनियुक्त संपर्क नेत्या शुभांगी पाटील यांना गद्दारांना इशारा दिला आहे.
Shubhangi Patil With Uddhav Thackerey
Shubhangi Patil With Uddhav ThackereySarkarnama

नाशिक : (Nashik) शिवसेनेच्या (Shivsena) महिला (Womens) समाजासाठी सरस्वतीचे कार्य करीत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackerey) यांचे नेतृत्व व स्थान बळकट करण्याचे काम आम्ही करीत आहोत. मात्र सत्तेला हपापलेल्या गद्दारांकडून त्यांच्या मार्गात अडथळे आणत आहेत. त्यांनी शाखांना हात लावण्याचे स्वप्नही पाहू नये. तसे करून राक्षसांचा अंत करायला आम्हाला दुर्गेचे रुप घ्यायला भाग पाडू नये, असा इशारा नवनियुक्त उत्तर महाराष्ट्र संपर्क नेत्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी बंडखोरांना दिला आहे. (Newly appointed Shubhangi Patil warns Eknath Shinde Group)

Shubhangi Patil With Uddhav Thackerey
Chhagan Bhujbal News; एकनाथ शिंदे यांनी आता थांबलेलंच बरं!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांना नुकतेच शिवसेना महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नियुक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमती पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाजाला सुरवात केली आहे.

Shubhangi Patil With Uddhav Thackerey
Dhule News; महापौरांचा संताप....80 लाख खर्च तरीही शहरात कचरा कसा?

याबाबत श्रीमती पाटील यांनी `सरकारनामा`शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने प्रारंभी मी सर्व महिला पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करेन. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेण्यास सुरवात केली आहे. काल मी धुळे जिल्ह्याच्या महिलांची बैठक घेतली. आज नाशिकला बैठक होणार आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनानुसार आम्ही आक्रमक पद्धतीने काम करण्यावर भर देणार आहोत.

त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे नेते आहेत. पक्षप्रमुख आहेत. देशातील मराठी माणसांची आस्था त्यांच्यावरच आहे. कोणालाही विचारले तर शिवसेना कोणाची याचे उत्तर फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच येईल. इतर काही कोणाच्या स्वप्नातही येणार नाही. मात्र सहा महिन्यांपूर्वी सुरत आणि गुवाहाटीला गेलेल्या चाळीस गद्दारांना त्यांच्या डोक्यावर राज्य करणाऱ्या महाशक्तीच्या जोरावर सत्तेच्या नादात गद्दारी केली. सत्तेची नशा त्यांच्या डोक्यात एव्हढी खोलवर गेली की ते सगळे विसरले आहे. आता त्यांनी थेट शिवसेनेवरच दावा केला आहे.

सत्ता कोणालाही कायमस्वरूपी मिळत नसते. जेव्हा ते सत्तेतून दुर केले जातील तेव्हा त्यांना भान येईल. मात्र सध्या ते शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचा विचार करीत आहे. विधीमंडळाचे कार्यालय त्यांनी सत्तेच्या आर्शिवादाने हिसकावले. मात्र शाखांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेच्या महिला सध्या सरस्वती म्हणून त्यांना योग्य मार्ग शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. शाखांवर त्यांची नजर गेली तर शिवसेनेच्या या रणरागीनी दुर्गा होतील व शाखेवर नजर टाकणाऱ्या राक्षसांना धडा शिकवतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com