
BJP MP Sujay Vikhe Patil News : नगर-दौंड महामार्गाचे सगळे काम पुर्ण झाले आहे, मात्र लोणीव्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) (Shrigonde) येथील रेल्वे गेट परिसरातील तीन किलोमीटर अंतराचे काम रखडले आहे.
या कामासाठी साडेतीन कोटींचा निधी खासदार डॅा. सुजय विखे पाटील (sujay Vikhe Patil) यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. त्या कामाचा प्रारंभ विखेपाटलांच्या हस्ते करण्यात आला. आमदार बबनराव पाचपुते, गणपतराव काकडे, भगवानराव पाचपुते आदी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात खासदार विखे यांच्यासमोर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये राडा झाला. त्यामुळे येथ काही काळ तणाव होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे तुफान शाब्दीक युद्ध झाले. या प्रकरणात खासदार विखे यांनी हस्तक्षेप करुन वाद मिटवला. 'सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद निवडणूका होवू द्या सगळे ठिक होईल,' असे सूचक वक्तव्य विखे यांनी यावेळी केले.
"विकासाचा प्रश्न आहे.कार्यकर्त्यांना मने मोकळे होण्याची जागा नसल्याने अशा कार्यकर्त्यांना संधी मिळते.सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत यापुर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असती तर सगळे म्यूट म्हणजे मूक दिसले असते थोड्या दिवस थांबा श्रीगोंद्यातही तेच दिसणार आहे," असे विखे म्हणाले.
नेमका काय प्रकार झाला..
कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते व राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी विखे यांचे कौतुक केले. त्यांच्याकामाबाबत त्यांनी अभिनंदन केले. अॅड. काकडे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढले. त्यानंतर पुन्हा नाहाटा यांनी माईक हातात घेतला आणि काकडे यांच्यावर शाब्दिक वार सुरु केले. त्याचवेळी काकडे उठून उभे राहिले आणि दोन्ही नेत्यांमध्ये तुफान शाब्दीक युद्ध झाले. खासदार विखे यांच्यासह अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.