Sachin Patil
Sachin PatilSarkarnama

नाशिकचे `ते`१६ पोलीस कर्मचारी ‘नॉट-रिचेबल’

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणाच्या चौकशीत सिव्हिलचे डॉक्टर्सही गवसेना

नाशिक : पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणात (Bogus Medical certificate) गुन्हा दाखल असलेले १६ पोलिस कर्मचारी अद्यापही नोट रिचेबल आहेत. तालुका पोलिस त्यांचा शोध घेण्यासाठी कर्तव्याच्या ठिकाणांसह मूळ गावी जाऊनही तेथेही हे पोलिस कर्मचारी मिळून न आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. (Bogus medical certificate case takes serious mode)

Sachin Patil
बापरे...विमा कंपनीला २२ कोटी भरपाईचे आदेश!

जिल्हा न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात गेलेल्या जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकही तालुका पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत.

Sachin Patil
वादग्रस्त बकालेंना उद्या तरी जामीन मिळेल का?

आंतरजिल्हा बदल्यांसाठी २१ पोलिस कर्मचाऱ्यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले होते. सदरील प्रमाणपत्र बनावट असल्याप्रकरणी गेल्या महिन्यात नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात २१ पोलिस कर्मचाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी डॉक्टरांचा समावेश आहे.

तालुका पोलिस ठाण्याच्या तपासात २१ प्रमाणपत्रांपैकी पाच पोलिस कर्मचारी हे चौकशीसाठी तालुका पोलीसात हजर झाले. तसेच त्यांच्या प्रमाणपत्रात दोष नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले. मात्र, उर्वरित १६ पोलिस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी नोटिसा बजावूनही ते हजर झालेले नाहीत. तसेच, त्यांना ताब्यात घेण्यासाठी तालुका पोलिस ठाण्याचे पथक जळगाव, पालघर व बृहन्मुंबई या कर्तव्याच्या ठिकाणीही पोहोचले, त्यांच्या मूळ गावीही पथक केले. मात्र ते मिळून आलेले नाहीत. त्यामुळे या पसार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसंदर्भातील पुरावे तालुका पोलिसांनी संकलित केले आहेत. त्यामुळे १६ पोलिस कर्मचारी जेव्हाही हजर होतील तेव्हा त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याचप्रमाणे नाशिक जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. श्रीवास, कर्मचारी किशोर पगारे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यानंतर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असता, पगारे याचा अटकपूर्व अर्ज फेटाळला आहे तर डॉ. सैंदाणे यांच्या अर्जावर पुढील महिन्याच्या १४ तारखेला सुनावणी आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून तिघेही पसार असून नॉटरिचेबल आहेत. तालुका पोलिसांच्या हाती पोलिसांसह सिव्हिलचे तिघे कर्मचारी लागत नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांबाबत १६ पोलिस कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके सातत्याने जात आहेत. तपास योग्यरितीने सुरू आहे.

- सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com