बापरे बाप..! लॉकरमध्ये पुन्हा १० कोटी ७३ लाखांचे घबाड

धुळे येथे अवैध सावकारी प्रकरणात अटकेत असलेल्या राजेंद्र बंब याच्या बँक लॉकरमधून मुद्देमाल जप्त केला.
बापरे बाप..! लॉकरमध्ये पुन्हा १० कोटी ७३ लाखांचे घबाड
Police with siezed money of lenderSarkarnama

धुळे : अवैध सावकारी प्रकरणी (Dhule) संशयित राजेंद्र बंब याने विविध ठिकाणी दडवून ठेवलेले घबाड पोलिसांकडून (Police) जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल १०.७३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे गेले दोन दिवस या सावकाराकडे झालेल्या तपासणीत रोज पोलिसांचे डोळे चक्रावणारी संपत्ती हाती लागत आहे. त्यामुळे अन्य सावकारांचेही धाबे दणाणले आहे. (Police shocked after seen the cash & Jwellery in Bank Locker)

Police with siezed money of lender
रक्षा खडसे म्हणाल्या, न्याय मिळेल, माझा न्यायालयावर विश्‍वास!

चार दिवसांपूर्वी एका कर्जदाराच्या तक्रारीमुळे श्री. बंब यांच्या अवैध सावकारीचे बिंग फुटले. त्यानंतर पोलिसांच्या तपासात रोज कोटयावधीची रक्कम सापडत असल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. हे प्रकरण एव्हढे दिवस कोणाच्या नजरेत कसे आले नाही, याची चर्चा सुरु आहे.

Police with siezed money of lender
अवैध सावकाराचे पाळेमुळे खोदणाऱ्या धुळे पोलिसांची पाठ थोपटली!

बंब याच्या दि शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेतील लॉकरमध्ये तब्बल पाच कोटी १३ लाखांवर रोकड, पाच कोटी ५८ लाखांवर दागिने दडवून ठेवल्याचे आढळून आले. यात दहा किलो सोन्याचे दागिने, सात किलो चांदीचे दागिने, ५८ यूएस, हाँगकाँग, सौदी अरेबिया येथील विदेशी नोटांचाही समावेश आहे.

आर्थिक गुन्हे शाखेसह उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संशयित अवैध सावकार राजेंद्र बंब याचे दि शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या येथील शाखेतील लॉकरवर शुक्रवारी (ता. ३) कारवाई केली. लॉकर तोडून तपासणी केली असता एकूण १० कोटी ७३ लाखांचा ऐवज आढळून आला. यात पाच कोटी १३ लाख ४४ हजार ५३० रुपयांची रोकड (विदेशी चलनाच्या ५८ नोटांसह), पाच कोटी ५३ लाखांचे १० किलो ५६३ ग्रॅम सोन्याचे दागिने (६७ सोन्याच्या बिस्किटांसह), पाच लाख १४ हजार रुपयांचे सात किलो ६३१ ग्रॅम चांदीचे दागिने, तसेच १२ सौदा पावत्या, पाच मूळ खरेदीखत, २४ कोरे धनादेश, स्वाक्षरी असलेले ५० स्टॅम्प पेपर, जेपी फायनान्सचे ५० फॉर्म, ११ धनादेश पुस्तिका, दोन खतावण्या व तीन डायऱ्या असा मुद्देमाल आढळून आला.

आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हेमंत बेंडाळे, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, कर्मचारी हिरालाल ठाकरे, गयासोद्दीन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर, तसेच उपनिबंधक मनोज चौधरी, राजेंद्र वीरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, शनिवारी संशयित बंब याच्या योगेश्‍वर पतपेढीतील लॉकरची तपासणी होईल. बंबचे राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही खाते असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. त्यादृष्टीनेही चौकशी केली जाणार आहे. तसेच शुक्रवारी जप्त करण्यात आलेल्या डायऱ्यांमधील नावांचीही खातरजमा केली जाणार आहे.

लॉकर पोलिसांच्या रडारवर

पोलिस कोठडीत असलेला राजेंद्र बंब तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी प्रशासकीय मदतीने रोकड, दागिने व मालमत्तांचे कागदपत्रे जमाविण्यास सुरवात केली आहे. आत्तापर्यंत दोन बँका व एका पतसंस्थेतील लॉकरची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा हे लॉकरही तपासणार आहे. या व्यतिरिक्त इतर बँकांतही त्याचे लॉकर असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित बँका व पतसंस्थांमधील त्याचे लॉकर सध्या पोलिसांच्या रडारवर आहे.

---

अवैध सावकारीमुळे जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिस, उपनिबंधक कार्यालय, रजिस्ट्रार ऑफिस यांचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. कायदेशीर तरतुदीनंतर पिळवणूक झालेल्या लोकांना मालमत्ता मिळू शकते.

-प्रवीणकुमार पाटील, पोलिस अधीक्षक, धुळे

--

-

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in