धक्कादायक; देश शोकमग्न असताना चित्रा वाघ जल्लोषात सहभागी होत्या!

दरम्यान यासंदर्भात कोविडच्या नियमांचे देखील उल्लंघन झाले.
Pritam Adhav & Chitra Wagh in celibrations
Pritam Adhav & Chitra Wagh in celibrationsSarkarnama

देवळाली : लष्करप्रमुख बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचे हेलीकॅाप्टर अपघातात निधन झाल्याने गुरुवारी सबंध देश शोकसागरात बुडाला होता. तेव्हा भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या देवळालीत आपल्या निकटवर्तीय प्रितम आढाव (Pritam Adhav) यांच्या विजयी मिरवणुक व जल्लोषात सहभागी झाल्या होत्या. या दुर्दैवी प्रकाराबाबत स्थानिक नागिरकांसह कार्यकर्त्यांनीही खंत व्यक्त केली आहे.

Pritam Adhav & Chitra Wagh in celibrations
भाजप नेत्याच्या हत्येनंतर `राष्ट्रवादी`चा गुन्हेगारांना राजाश्रय!

दरम्यान यासंदर्भात कोविडच्या नियमांचे देखील उल्लंघन झाले. त्यामुळे पोलिसांनी या भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात सहभागी झालेल्या भाजप नेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

देशातील कॅन्टोनमेंट बोर्डांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर केंद्र सरकारकडून उपाध्यक्षपदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये देवळालीच्या प्रितम आढाव या भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा आहेत. त्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या मानसकन्या असल्याचे सांगण्यात येते. श्रीमती वाघ यांच्या प्रयत्नांमुळेच त्यांची केंद्र सरकारने कॅन्टोनमेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. यासंदर्भात त्यांनी काल आपला पदभार स्विकारला.

Pritam Adhav & Chitra Wagh in celibrations
संतप्त भाजप आमदार जयकुमार रावल ‘पीडब्लूडी’वर भडकले

बुधवारी कन्नूर (तमिळनाडू) येथे लष्कराच्या हेलीकॅाप्टरला अपघात झाला. त्यात लष्कराचे सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी तसेच बारा वरिष्ठ लष्करी अधिकारी हुतात्मा झाले. त्यामुळे सबंध देश शोकसागरात बुडाला होता. देवळाली कॅम्प ही तर लष्करी छावनीच आहे. त्यामुळे येथेही सर्व नागरिक, लष्कर दुःखात होते. मात्र विजयाच्या उन्मादात कुमारी आढाव यांना त्याचे भान राहिले नाही. त्यांनी सबंध शहरभर अनेक होर्डींग्ज लावले. चित्रा वाघ यांसह सर्व निकटवर्तीय महिलांना फेटे बांधले. ढोल-ताषाच्या गजरात मिरवणूक काढली. एव्हढ्यावर न थांबता मिरवणूकीच्या मार्गात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. फटाक्याच्या या धुमधडाक्यात ते लष्करप्रमुखांसह तेरा वरिष्ठ लष्करी अधिकारी हुतात्मा झाले आहेत हे देखील विसरल्या. विशेष म्हणजे अनुभवी नेत्या व प्रत्येक गोष्टीत सरकारच्या चुका काढत त्यांना सल्ला देणाऱ्या चित्रा वाघ यांनी तरी त्यांनी रोखने अपेक्षीत होते. प्रत्यक्षात त्या देखील त्यात सहभागी झाल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. या मिरवणूकीत भाजपचे ज्येष्ठ एकनाथराव शेटे, बाबूराव मोजाड, कैलास गायकवाड, दक्षता आढाव, सोनी आढाव असे विविध पदाधिकारी सहभागी झाले.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे, तालुका अध्यक्ष गणेश गायधनी याबाबत नाराजी व्यक्त केली. जनरल बिपीन रावत हे हेलिकॅाप्टर अपघातात शहीद झाले. त्यामुळे सबंध देश हळहळ व्यक्त आहे. शोकसागरात बुडालेला आहे. अशा स्थितीत भाजपच्या नेत्यांनी अेस ग्रँड सेलीब्रेशन करणे, फटाके वाजविणे, संवाद्य मिरवणूकस गुलाल उधळणे हे ऐकुण धक्का बसला. ही एक नियुक्ती आहे. अशावेळी संयम पाळायला हवा होता.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com