Shivsena : शिवसेनेला पुन्हा धक्का...माजी नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात

प्रवेश करताच बंटी तिदमे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
C.M. Eknath shinde welcomes Bunty Tidme
C.M. Eknath shinde welcomes Bunty Tidme Sarkarnama

नाशिक : इगतपुरीतील (Igatpuri) माजी आमदार व काही सरपंचानंतर आज शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक तसेच म्युनिसीपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष (NMC Kamgar sena) बंटी तिदमे (Bunty Tidme) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला. त्यामुळे शहरातील शिवसेनेला हा दुसरा धक्का मानला जातो. याबाबात शिवसेनेचे नेते गाफील कसे? असा प्रश्न केला जात आहे. (Shivsena will take this incidence seriously at party lavle)

C.M. Eknath shinde welcomes Bunty Tidme
NCP News: नरहरी झिरवळांनी दिंडोरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले

नाशिक शहर शिवसेनेला आज पुन्हा धक्का बसला. शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच महानगरापलिका कामगार सेनेचे अध्यक्ष बंटी तिदमे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आज सकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी हा प्रवेश केला. त्याआधी त्यांनी ठाणे येथे शिंदे गटाच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी वरीष्ठ त्यांशी चर्चा करून त्यांना नाशिक महनगरप्रमुखपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

C.M. Eknath shinde welcomes Bunty Tidme
Nana Patole: नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे

यावेळी खासदार हेमंत गोडसे, अनिल ढिकले, भूषण अडसरे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटल्यावर वेगळा गट स्थापन केला होता. त्यानंतर विविध भागातून निवडक कार्यकर्ते त्यांच्या गटात सामील झाले. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी नाशिकला येऊन मेळावा गेतला. विविध पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

खासदार राऊत यांच्या दौऱ्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले होते. सध्या शहरात शिवसेनेत वजन असलेल्या कोणीही शिंदे गटात प्रवेश केलेला नव्हता. त्यामुळे खासदार गोडसे यांनी आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी विविध कार्यकर्त्यांना चुचकारण्याचे काम सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना शहरात विशेषतः शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सिडको भागातील माजी नगरसेवक गळाला लागल्याने शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. त्यांनी लगेचच तिदमे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in