भाजपला धक्का देत काँग्रेसने सुरु केले इनकमिंग

तिघा नेत्यांसह विविध भाजप पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीय गणितांवर दूरगामी परिणाम होणार आहे.
भाजपला धक्का देत काँग्रेसने सुरु केले इनकमिंग
BJP leaders joins Congress Party Sarkarnama

नाशिक : हरसूल (Harsul) जिल्हा परिषद (Z.P.) गटाचे नेते विनायक माळेकर (Vinayak Malekar) यांनी आज भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. त्यांच्याबरोबर त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) पंचायत समितीचे सभापती मोतीराम दिवे, (Motiram Dive) शिवसेनेचे (Shivsena) युवा नेते मिथुन राऊत (Mithun Raut) यांनीही प्रवेश केला आहे. तिघा नेत्यांसह विविध भाजप पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीय गणितांवर दूरगामी परिणाम होणार आहे.

BJP leaders joins Congress Party
राज ठाकरेंचा नाशिक प्रवास खडतर ...!

शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवून काँग्रेस प्रवेश केला आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, संपतराव सकाळे आदींच्या उपस्थितीत सर्वांचे स्वागत करण्यात आले.

हरसूल गटाच्या अपक्ष जिल्हा परिषद सदस्या इंजि. रुपांजली माळेकर यांचे पती तथा इंजि. विनायक माळेकर हे हरसूल गटातील दिग्गज व्यक्तिमत्व आहे. त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष (कै) पांडुरंग राऊत यांचे चिरंजीव मिथुन राऊत यांचाही तालुक्यात दबदबा असून युवा पिढीवर त्यांची भक्कम पकड आहे. या तिघांच्या काँग्रेस प्रवेशाने दोन्ही तालुक्यात कॉंग्रेस अधिक मजबूत होणार असा कयास मानला जात आहे. शेकडो समर्थकांसह तिघांनी काँग्रेस पक्षाला बळकट केले आहे.

BJP leaders joins Congress Party
स्वपक्षाच्या बाणांनींच सत्ताधारी भाजप रोज होतोय घायाळ?

गणपत जाधव, दिनकर मोरे, यशवंत महाले, सागर चव्हाण, गणेश कोठुळे, रोहिदास बोडके, देवचंद तिदमे, गोकुळ कसबे, शरद महाले, मोहन बेंडकोळी, जयराम मोंढे आदी उपस्थित होते. निरगुडेचे सरपंच प्रवीण तुंगार, चिरापाली सापतपालीचे सरपंच मोहन कनोजे, वायघोळचे सरपंच सुरेश झोले, सारस्तेचे सरपंच जानकीराम गायकवाड, चिंचवडचे सरपंच भगवान बेंडकोळी, सोमनाथनगरचे सरपंच मनोहर बेंडकोळी, माजी सरपंच अमृता कनोजे, ललित तरवारे, रामचंद्र लिलके, गोपाळ राऊत, अशोक राऊत, दत्ता भोये, अशोक कनोजे, तोरंगणचे माजी सरपंच रामदास बोरसे, मुरलीधर बोरसे, वायघोळचे माजी सरपंच यशवंत धनगर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी यांनीही पक्षप्रवेश केला.

...

हरसूलसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विकासाला गती देण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आदिवासी दुर्गम भागातील सर्व विकासकामे आगामी काळात होतील. समावेशक विचारधारेच्या पक्षात राहून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे माझे स्वप्न आहे.

- विनायक माळेकर, नूतन काँग्रेस नेते हरसूल

...

माझे वडील पांडुरंग राऊत यांनी हरसूल भागातील जनता जनार्दनासाठी खूप काम करायचे स्वप्न होते. काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न यशस्वी होईल. जनतेसाठी यापुढेही माझी जनसेवा अविरत सुरू राहील.

- मिथुन राऊत, युवानेते

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.