दिलीप बनकरांचा शिवसेनेला धक्का; पिंपळगाव बाजार समितीवर पुन्हा ताबा!

शासनाच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती देत माजी आमदार कदम समर्थकांचा दावा न्यायालयाने फेटाळला
MLA Dilip Bankar & Ex MLAAnil Kadam
MLA Dilip Bankar & Ex MLAAnil KadamSarkarnama

पिंपळगाव बसवंत : शासनाच्या (State Government) निर्णयानुसार पिंपळगाव बाजार समितीच्या (Pimpalgaon Baswant apmc) प्रशासकाच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. संचालक मंडळच कार्यान्वित राहणार असल्याने पिंपळगाव बाजार समितीची सूत्रे पुन्हा आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांच्याकडे गेली आहेत. यामध्ये शिवसेना (Shivsena) नेते माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) समर्थकांचा दावा न्यायालयाने फेटाळला.

MLA Dilip Bankar & Ex MLAAnil Kadam
सहकाऱ्यांना मागे सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा!

पिंपळगाव बाजार समितीचा कारभार प्रशासकांकडेच असावा, असा माजी आमदार अनिल कदम यांच्या समर्थकांनी केलेल्या दावा न्यायालयाने फेटाळून लावला. बाजार समितीच्या प्रशासक पदावरून बनकर-कदम यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आमदार बनकर न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा एकदा वरचढ ठरले.

MLA Dilip Bankar & Ex MLAAnil Kadam
धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे!

एक वर्ष मुदतवाढ संपलेल्या बाजार समित्यांवर प्रशासकांची नेमणूक करण्याचे आदेश सर्वाच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार शासनाने आदेश देत जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी पिंपळगाव बाजार समितीवर सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांची नेमणूक केली होती. शासनाच्या या नेमुणकीला बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांनी आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली. विशेष म्हणजे आमदार बनकर सत्ताधारी गटाचे सदस्य आहेत.

पिंपळगाव बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक झाल्याने आमदार बनकर यांच्या २२ वर्षांच्या सत्तेला ‘ब्रेक’ लागल्याने विरोधी गटात आनंदाचे वातावरण होते. पण प्रशासक प्रेरणा शिवदास यांनी आदेश मिळून पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी गटात चलबिचल झाली. अखेर आमदार बनकर यांनी प्रशासक नियुक्तीला उच्च न्यायालयात दावा दाखल करून विरोध केला. त्यांच्या दाव्याला शह देण्यासाठी माजी आमदार अनिल कदम यांच्या समर्थकांनी बाजार समितीवर प्रशासकच हवा, असा प्रतिदावा केला. पर्यावरण विभाग, जिल्हा बँकेची कारवाई, कर्मचाऱ्यांची पदोन्नती अशा मुद्दयावरून आमदार बनकरांना हटवून प्रशासक नेमण्याची मागणी आमदार कदम यांच्या समर्थकांनी केली होती.

आमदार बनकर यांनी पर्यावरण व जिल्हा बँकेच्या प्रकरणाला शासनाची स्थगिती व कर्मचाऱ्यांची पदोन्नती हे नियमानुसार असल्याचे स्पष्ट केले. तसेच बाजार समितीची निवडणुक घ्यावी, असे पत्र शासनाला सादर केले होते. उच्च न्यायालयांने दोन्ही बाजू ऐकून घेत प्रशासक नियुक्तीला स्थगिती देत संचालक मंडळ बाजार समितीचे कामकाज पाहण्याचे आदेश दिले. त्यामुळे बाजार समितीची सत्तासूत्रे आमदार बनकर यांच्याकडे कायम राहतील. पण त्यांनी शासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेऊन घरचा आहेर दिला आहे.

प्रशासक स्थगितीच्या निकालामुळे राजकीय संघर्षात आमदार बनकर यांनी पुन्हा एकदा माजी आमदार कदम यांच्यावर कुरघुडी केली. दरम्यान, आमदार बनकर यांनी शनिवारी पिंपळगाव बाजार समितीत सभापतिपदाच्या दालनातून कामकाज पाहीले. आगामी टोमॅटो हंगामाच्या पूर्वतयारीच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. गाजरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांतील सरिता गाजरे यांना २५ हजारांचा धनादेश सुपूर्द केला.

...

मुदत संपताच निवडणूक घ्यावी, अशा मागणीचा ठराव पिंपळगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाने शासनाकडे पाठविला होता. निवडणूक न घेता प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयामुळे बाजार समितीच्या कामकाजावर विपरित परिणाम झाला असता. विरोधकांनी खोडसाळपणा केला. पण ते पुन्हा एकदा तोंडावर पडले.

- आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com