शिवसेनेच्या प्रचार, प्रसाराची सुत्रे आता महिलांकडे!

नाशिक शहरातील प्रभाग आठमध्ये महिला आघाडीच्या शाखेचे उद्‌घाटन झाले.
Shivsena city chief Sudhakar Badgujar & Baban Gholap

Shivsena city chief Sudhakar Badgujar & Baban Gholap

Sarkarnama

नाशिक : शिवसेनेच्या महिला आघाडीचा संघटन विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सर्व क्षेत्रातील महिला शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करीत असल्याने पक्षासाठी हा शुभ संकेत आहे. त्यांनी पक्षाच्या प्रचार आणि प्रसारात आघाडी घेतल्याने आता आपल्याला महापालिका (NMC) निवडणुकीत एकहाती सत्ता काबीज करण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी केले.

<div class="paragraphs"><p>Shivsena city chief Sudhakar Badgujar &amp; Baban Gholap</p></div>
...आता राज्यात हमीभावाच्या कायद्यासाठी लढा होणार!

शहरातील प्रभाग आठ आणि नऊमधील शिवसेना महिला आघाडीच्या सहा शाखांचे उद्‌घाटन माजी मंत्री व उपनेते बबनराव घोलप, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, संपर्क संघटक रंजनाताई नेवाळकर, संगीता खोडाणा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. बडगुजर बोलत होते.

<div class="paragraphs"><p>Shivsena city chief Sudhakar Badgujar &amp; Baban Gholap</p></div>
अबब...त्या `गब्बर`ची संपत्ती मोजायला पाच दिवस लागले!

शिवसेनेच्या महिला आघाडीचे कार्य नेत्रदीपक असेच आहे. विविध उपक्रम राबवून महिला आघाडीने महिलांना न्याय मिळवून दिला, तर कोविडच्या काळातीळ त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. आता आगामी निवडणुका लक्षात घेता महिला आघाडीने नववर्षापासून सुरू होणाऱ्या शिवसंपर्क अभियानात भरीव योगदान देऊन प्रत्येक मतदाराशी वैयक्तीकरित्या संपर्क साधून पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे, असे माजी मंत्री व उपनेते बबनराव घोलप आपल्या भाषणात म्हणाले.

प्रभाग आठमध्ये नवश्या गणपती (गंगापूर रोड), गणेशनगर बसस्टॉप (पाइपलाइन रोड), आनंदवली बसस्थानकशेजारी गुरुकृल काॕलनी (पारिजातनगर, वनविहारमागे), तर प्रभाग नऊमधील भवर टॉवर (शिवाजीनगर), पार्थ पॅलेस (श्रमिकनगर) येथे या सहा नवीन शाखा उघडण्यात आल्या. माजी महानगरप्रमुख महेश बडवे, उपमहानगर प्रमुख देवा जाधव, शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका नयना गांगुर्डे, राधाताई बेडकोळी, करण गायकर उपस्थित होते.

महिला पदाधिकारी मंदा दातीर, मंगला भास्कर, प्रेमलता जुन्नरे, कीर्ती जवखेडकर, सुरेखा लोळगे, मनीषा लासुरे, कीर्ती निरगुडे, सविता गायकर, सुनीता जाधव, मीना देवकर, शोभा पवार,फैमिदा रंगरेज, श्रुती नाईक आदींचा सत्कार करण्यात आला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com