Shivsena News; भाजपच्या आमदारांनो श्रेय घेता तर निधी आणून दाखवा!

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना आव्हान
Jalgaon Munuciple corporation
Jalgaon Munuciple corporationJalgaon

जळगाव : शहरात (Jalgaon) रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. त्या कामांवर आता भाजप (BJP) नेत्यांनी आपल्या नावाचे फलक लावले आहेत. त्याला महापालिकेतील (Municiple corporation) सत्ताधारी शिवसेनेने (Shivsena) आक्षेप घेतला आहे. श्रेयासाठी नावाचा फलक लावण्याची घाई करीत आहात तशीच १०० कोटी रुपयांचा निधी आणण्यासाठी तत्परता दाखवा, असे आव्हान महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी भाजप आमदारांसह सर्व नेत्यांना दिले आहे. (Jalgaon Corporation ruling party Shivsena ask BJP MLA for funds)

Jalgaon Munuciple corporation
Transfer issue; ‘पीडब्लूडी’मध्ये पदाभारावरून अधिकाऱ्यांत रंगले नाट्य

महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर पत्रकार परिषद झाली. उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेनेचे महापालिका गटनेते बंटी ऊर्फ अनंत जोशी, नगरसेवक नितीन बर्डे उपस्थित होते.

Jalgaon Munuciple corporation
BJP Vice President Resign : भाजपला धक्का: प्रदेश उपाध्यक्षाने दिला राजीनामा

गटनेते बंटी जोशी म्हणाले, की राज्य शासनाने दिलेल्या ३८ कोटींच्या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र, कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्त्याच्या कामावर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे फलक लावण्यात आला आहे. त्यावर राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे यांची नावे आहेत. मात्र, प्रोटोकॉलप्रमाणे महापौर व उपमहापौर यांचे नाव का नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. शहरातील रस्त्यांच्या कामासाठी निधी आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. मग त्या फलकावर केवळ भाजप आमदारासह नेत्यांचीच नावे का? शासनाच्या नियमाप्रमाणे फलक लावायचाच असेल, तर त्यावर प्रोटोकॉलप्रमाणे महापौर व उपमहापौर यांचेही नाव आवश्‍यक होते. विशेष म्हणजे रस्त्यांची कामे अद्याप सुरू आहेत. त्यामुळे फलक लावून श्रेय घेण्याची भाजपला घाई का आहे?

उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले, की ज्या तत्परतेने ते फलक लावत आहेत. त्याच तत्परतेने शहरातील कामासाठी शंभर कोटींचा निधी आणण्यासाठीही त्यांनी प्रयत्न करावेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हा फलक लावला आहे. कुणाच्या आदेशाने त्यांनी हा फलक लावला, याचा खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन म्हणाले, की आम्ही सर्व बाबतीत भाजपला विश्‍वासात घेऊन काम केले आहे. अगदी शिवाजीनगर पुलावर महापालिका निधीतून लाइट बसविले. त्याचे उद्‌घाटन आमदार भोळे यांच्या हस्ते केले. या रस्त्याचा निधी आण्यासाठी आम्हीही प्रयत्न केले. मात्र, श्रेयासाठी केवळ भाजप आमदार व नेत्यांची नावे लावणे चुकीचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in