Shivsena: शिवसेनेवर कितीही संकटे येऊ दे, आम्ही सर्व निष्ठावंत सज्ज!

शिवसेनेकडून माजी नगरसेवकांच्या घरी जात नेते, पदाधिकाऱ्यांनी सुरु केले डॅमेज कंट्रोल.
Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSarkarnama

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे (Pravin Tidme) गटात गेल्यानंतर लगेच महानगरप्रमुखपद जाहीर झाले. यानंतर जिल्हा (Nashik) शिवसेनेत घडामोडी गतिमान झाल्या. बुधवारी दिवसभर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील सगळ्या माजी नगरसेवकांच्या घरी भेटी देत डॅमेज कंट्रोल (Damage Control) सुरु केले. (Shivsena leaders start damage control in City organisation)

Sudhakar Badgujar
Shivsena Alert: सतर्क झालेल्या नेत्यांची नाशिकमध्ये `घर- घर` मोहीम!

नाशिक रोड भागातील माजी नगरसेवकांच्या घरापासून सुरवात करीत शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांनी सगळ्यांशी चर्चा केली. शुक्रवारी (ता.२३) शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांसह सर्व पदाधिकारी मुंबईला जाऊन निष्ठा व्यक्त दर्शवीत ऐक्याचे दर्शन घडविणार आहेत.

Sudhakar Badgujar
एकनाथ शिंदे अन् त्यांनी फोडलेल्या नगरसेवकांचा फैसला एकाच दिवशी?

उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आदींनी घरोघर फिरून चर्चा केली. शिवसेना, युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना, महिला आघाडी, तसेच इतर सर्व अंगीकृत संघटनांचे आजी- माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवारांचा त्यात समावेश असेल.

यावेळी हे नेते म्हणाले, शिवसेनेवर कितीही संकटे आली तरी त्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही सर्व निष्ठावंत सज्ज आहोत. आम्ही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे दाखवून देण्यासाठी नाशिक महानगरांतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत सदिच्छा भेट घेणार आहेत. राज्यात काही जणांनी शिवसेनेची साथ सोडली असली तरी नाशिक शहरातील शिवसेनेवर त्याचा परिणाम होणार नाही. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकीची वज्रमूठ आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहील.

शुक्रवारी दुपारी बाराला मुंबईला पोचून उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची असे ठरल्याचे, असे श्री. बागूल यांनी स्पष्ट केले.

दिवसभर पदाधिकारी सक्रिय

डॅमेज कंट्रोल करण्यात दिवसभर शिवसेनेचे पदाधिकारी सक्रिय होते. श्री. तिदमे यांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर उपनेते श्री. बागूल यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाशिक रोडपासून सुरवात करीत शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या. नाशिक रोडला ज्योती खोले, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, रोशन आढाव आदीच्या भेटीगाठी झाल्या. शुक्रवारच्या मुंबई दौऱ्याची माहिती दिली. दरम्यान, एखादा दुसरा गेला तरी नाशिक शहरातील नगरसेवक शिवसेनेतच राहणार असल्याचे आजच्या दौऱ्यात पुढे आल्याचे श्री. बागूल यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in