इगतपुरीचा शिवसेनेचा गड उद्धव ठाकरेंसोबत!

स्थानिकांभोवतीच राजकारण केंद्रित झाल्याने कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत
Uddhav Thakrey
Uddhav ThakreySarkarnama

अस्वली : राज्यात (Maharashtra) गेल्या महिनाभरापासूनच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर सत्तांतर झाले आहे. इगतपुरीतील माजी आमदार, युवासेनेचे पदाधिकारी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakrey) यांच्याप्रती निष्ठा असलेले कडवट शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांच्याशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे शिवसेनेचा (Shivsena) हा गड अभेद्य राहिला आहे. (Shivsena`s all office bearers firmly with Uddhav Thakrey)

Uddhav Thakrey
शिवसेनेचे बाळा कोकणेवर प्राणघातक हल्ला

त्यामुळे अनेक जिल्ह्यांमधून शिवसेनेच्या आमदार, खासदार, नगरसेवक, आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह तळागाळातील शिवसैनिकांनी शिंदे गटात सामील होत पाठिंबा दिला आहे. शिवसेनेसोबत कायम असल्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. वेगाने घडणाऱ्या घडामोडींवरुन आगामी काळातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरीच असल्याचे चित्र आहे.

Uddhav Thakrey
Shiv Sena : ठाकरेंना शिवसेना भवनातून हटविण्याचा शिंदे यांचा प्लॅन

इगतपुरीचे नगराध्यक्ष शिवसेनेचे असून पंचायत समितीच्या सत्तेच्या चाव्याही शिवसेनेच्याच ताब्यात होत्या. जिल्हा परिषदेवरही पाचपैकी तीन जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचेच निवडून आले होते. हिंदुत्वाच्या आणि इतर मुद्यावर महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला शिंदे गट वेगळा झाला आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले, मात्र इगतपुरीच्या स्थानिक शिवसेना आक्रमक झाली नसली तरीही पक्ष संघटनेतील चालू घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आगामी काळात खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदाची धुरा मजबूतपणे सांभाळणारे ज्येष्ठ नेते निवृत्ती जाधव यांनी असंख्य शिवसैनिकांना हाताशी धरून शिवसेनेचे मजबूत संघटन केले आहे. त्यांच्याबरोबरच मोहन बऱ्हे यांनीही युवा सेनेच्या माध्यमातून नवयुवकांच्या मनावर शिवसेनेचे प्राबल्य वाढवले आहे. २०१९ मधील विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार निर्मला गावित यांनी पक्षाचे तिकीट मिळवून विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख व इतर नेत्यांशी त्यांचे हितसंबंध चांगले असल्याने जिल्ह्यासह तालुक्यात शिवसेनेत फूट पडू नये यासाठी राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर भाजप व इतर घटक पक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत विनंती देखील करुन आल्या आहेत.

शिवसेनेचा दबदबा

तालुक्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, मनसे हे पक्ष अस्तित्वात असले तरीही शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. लोकहितासाठी सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यात विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेचा नेहमीच दबदबा राहिला आहे. आजही तालुक्याच्या महत्वाच्या प्रमुख पदांवर शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. त्याच मुळे तालुक्यात स्थानिक नेत्यांभोवतीच राजकारण फिरत आले आहे.

शिवसेनेच्या पाठिशी खंबीर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांची शिवसेना स्थापनेच्या काळापासून अनेक आंदोलनांमध्ये लाठयाकाठया खाऊन दुःखी पीडित कष्टकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र झटणारी संघटना म्हणून शिवसेना नावारूपाला आली आहे. प्रसंगी रक्त सांडलेल्या अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू.

- निवृत्ती जाधव, उपजिल्हाप्रमुख.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com