Shivsena: शिवसेनेचा देखावा...'कठपुतली ला विचार नसतो'

शिवसेनेच्या इंदिरानगर येथील मंडळाच्या देखाव्याची शहरभर चर्चा.
Shivsena flex on Ganesh festival scene
Shivsena flex on Ganesh festival sceneSarkarnama

इंदिरानगर : येथील शिवसेना (Shivsena) प्रणीत युवक मित्र मंडळाने गणेशोत्सवात (Ganesh Festival) `कठपुतली`चा (Puppet show) देखावा केला आहे. शेजारीच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackray) यांचा फलक आहे. त्यावर 'कठपुतली ला विचार नसतो' अशा आशयाचा महाकाय फलक लावला आहे. खरे तर ही थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर टिका आहे. या फलकाचा राज्य सरकार व मुख्यमंत्री यांच्याशी काहीही संबंध नाही, असे कितीही सांगितले, तरी नागरिकांत मात्र हा देखावा चर्चेचा विषय ठरला आहे. (Shivsena`s puppet show decoration on political massage is in discussion)

Shivsena flex on Ganesh festival scene
MVP News: नितीन ठाकरे यांनी शरद पवारांची दिशाभूल केली!

देखावा परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. नागरिक जेव्हा याबाबत संयोजकांना विचारतात, तेव्हा शिवसेनेमधील फूट आणि राज्यातील नवे सरकार याच्याशी याचा काहीच संबध नाही, असे कीतीही सांगितले तरी अप्रत्यक्ष त्यावरच हे भाष्य आहे अशा प्रतिक्रीया नागरीकात उमटतात.

Shivsena flex on Ganesh festival scene
Ambadas Danve: अमित शहांचे मुंबईप्रेम हे बेगडी आहे

एरव्ही कठपुतली म्हटली की लहान मोठ्या सर्वांनाच या बाहुलीचा नाच आणि विविध गाण्यांवर केलेली करमणूक असे चित्र डोळ्यापुढे येते. ते सगळ्यांना भावते. विशेषतः लहान मुलं त्यात अधिक रमतात.

इंदिरानगरच्या रथचक्र चौकात शिवसेनाप्रणीत युवक मित्र मंडळाने संस्थापक संजय गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त उभारलेला हा देखावा बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. लहानग्यांची करमणूक होत असताना सोबत असणाऱ्या मोठ्यांचे लक्ष मात्र शेजारीच लावलेला बाळासाहेब ठाकरे यांचे जणू देखावा दाखवणारे छायाचित्र असलेला फलक आणि त्यावर असणाऱ्या ओळी लक्ष वेधून घेतात.

'कठपुतली'ला विचार नसतो, दोरी ज्याच्या हातात, त्याच्याच विचारांनी नाचावच लागतं' या ओळी या फलकावर आहेत. त्याचा संबंध येथे भेट देणारे नागरिक शिवसेनेतील फूट आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार याच्याशी लावत आहेत. अनेकांनी याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विचारले देखील. मात्र राजकीय बाबींचा आणि या देखाव्याचा काही संबंध नसून करमणुकीसाठीच हा देखावा उभारला आहे, असे स्पष्ट करण्यात येते.

मात्र कठपुतली चा खेळ कसा चालतो याचा संबंध नागरिक मात्र राजकीय परिस्थितीशीच लावत आहेत. हा फलक आणि हा देखावा आता सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी प्रकाश चौधरी ,पंकज कराडे, मंडळाचे अध्यक्ष आदित्य दुसाने, कार्याध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष मनोज सैंदाणे आणि सदस्यांनी त्याचे संयोजन केले आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in