शिवसेनेचे अनिल कदमच निफाडचे आमदार होतील!

निफाड येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार विनोद घोसाळकर यांनी मार्गदर्शन केले.
शिवसेनेचे अनिल कदमच निफाडचे आमदार होतील!
Anil KadamSarkarnama

निफाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UddhavThakre) यांच्या संकल्पनेतून सर्वत्र शिवसंपर्क अभियान (Shivsena) सुरू आहे. त्यांनी केलेली कामे शिवसैनिकांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवावी. निफाड तालुक्यातही शिवसैनिकांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती निवडणूकांच्या माध्यमातून संपूर्ण निफाड मतदारसंघात भगवा फडकवावा, असे आवाहन शिवसेना उपनेते, म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनोद घोसाळकर (MLA Vinod Ghosalkar) यांनी केले. (Shivsena workers should active for party propoganda)

Anil Kadam
ज्यांनी उद्धव ठाकरे यांचा छळ केला, त्यांना डोक्यात ठेवा!

निफाड येथील रुद्राय हॉटेलमध्ये आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी आमदार अनिल कदम, माजी जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, संघटिका स्नेहल मांडे, जिल्हाप्रमुख सुनील पाटील आदी होते.

Anil Kadam
अजित पवारांच्या दणक्याने भाजपला दादागिरी महागात पडली!

यावेळी ते म्हणाले, तळागाळातील शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्यामुळे सर्वत्र शिवसंपर्क अभियान जोरात सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकल्यास निफाड विधानसभा मतदारसंघात २०२४ मध्ये शिवसेनेचे अनिल कदमच आमदार होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

अनिल कदम म्हणाले, निफाड तालुक्यातील शिवसैनिकांच्या पाठबळावरच आपण दोनदा आमदार झालो. मात्र, सध्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुन्हा जोमाने काम सुरू करणे आवश्यक आहे. विरोधक सत्तेचा दुरुपयोग करत असूनही आपला संघर्ष सुरूच आहे. पिंपळगाव बाजार समिती निवडणूक आपण पूर्ण ताकदीने लढवणार असून, यापुढे शिवसैनिकांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्यास नगरसेवक अनिल पाटील- कुंदे, प्रशांत पगार, प्रकाश महाले, स्वप्निल कदम, ललित गिते, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके- पाटील, शरद कुटे, शाम जोंधळे, युवासेना समन्वयक अनिकेत कुटे, दत्तू भुसारे, सागर जाधव, बाळासाहेब पावशे, नंदू निरभवणे, रघुनाथ ढोबळे, कृष्णा ढोबळे, रामदास खालकर, भाऊसाहेब खालकर, बाळासाहेब सरोदे, सागर बोडके आदी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी युवासेना समन्वयक निलेश गवळी, नगराध्यक्ष रुपाली रंधवे, तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, लोकाधिकार समितीचे विलास घुगरे, श्री. बनसोडे, निलेश पाटील, दीपक शिरसाठ, अनिल कुंदे, मुकुंद होळकर, डॉ. धारराव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष भारती जाधव, तालुकाध्यक्ष सुलभा पवार, युवासेना अधिकारी आशिष शिंदे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in