धुळे-नंदूरबार बँकेत शिवसेनेचे आमशा पाडवीसह तिघे बिनविरोध

शिवसेना वगळून शेतकरी विकास पॅनलद्वारे सर्वपक्षीय नेते संघटित; १७ जागांसाठी ११२ अर्ज
noppoed Bharat Mali & Rajvardhan Kadambande
noppoed Bharat Mali & Rajvardhan Kadambande Sarkarnama

धुळे : धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Dhule, Nandurbar DCC Bank) संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक (Director board election) बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये मतदारसंघातून नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यातून दीपक पाटील, (Deepak Patil) तळोद्यातून भरत माळी (Bharat Mali) आणि अक्कलकुव्यातून शिवसेनेचे आमशा पाडवी (Aamsha Padvi) बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात शेतकरी विकास पॅनेलचे दोघे, तर शिवसेनेचा एक संचालक आहे.

noppoed Bharat Mali & Rajvardhan Kadambande
गिरीश महाजन तुम्ही हे काय केलं?, नाथाभाऊंचे काम सोपे केलं!

या बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेना वगळून इतर प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची स्थापना झाली आहे. याअंतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत बुधवारी ३६ इच्छुकांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी मतदारसंघासाठी मिळून ६२ अर्ज, तर निवडणुकीतील १७ जागांसाठी अंतिम मुदतीत एकूण ६६ इच्छुकांनी ११२ अर्ज दाखल केले.

noppoed Bharat Mali & Rajvardhan Kadambande
`यामुळे` यंदा आतषबाजीसह दिवाळी होणार धुमधडाक्यात!

हे तिघे झाले बिनविरोध...

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शिवसेना वगळून धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचे नेते संघटित झाले आहेत. त्यांनी सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली आहे. यात बुधवारी या पॅनलचे उमेदवार व विविध कार्यकारी संस्था मतदारसंघातून नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यातून दीपक पाटील, तळोद्यातून भरत माळी आणि अक्कलकुव्यातून शिवसेनेचे आमशा पाडवी बिनविरोध निवडून आले आहेत. या तीन उमेदवारांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध झाले. या स्थितीमुळे आता १४ जागांसाठी निवडणूक होईल. मात्र, निवडणूक यंत्रणेच्या निकषांप्रमाणे माघारीच्या ८ नोव्हेंबरला अंतिम दिवशी या तीन्ही उमेदवारांनी माघार घेतली नाही तर ते अधिकृतपणे बिनविरोध उमेदवार म्हणून जाहिर होतील. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलद्वारे बिनविरोध झालेले उमेदवार भरत माळी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार केला.

प्राथमिक कृषी पतसंस्था, विविध कार्यकारी संस्था, आनुषंगिक सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था, धान्य अधिकोश सहकारी संस्था, आदिवासी सेवा सहकारी संस्था आदींच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय प्रतिनिधींच्या प्रत्येकी एकप्रमाणे दहा जागा, महिला प्रतिनिधींच्या दोन, अनुसूचित जाती किंवा जमातीची एक जागा, इतर मागासवर्गातील एक जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील एक जागा, कृषी व पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्थेची एक जागा, इतर शेती संस्थेची एक जागा, अशा एकूण १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

या इच्छुकांनी भरले अर्ज

निवडणूक यंत्रणेकडे बुधवारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्या पत्नी सीमा रंधे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी सभापती बाजीराव पाटील, किशोर पाटील, भरत गावित, अक्षय सोनवणे, सचिन देसले, हृषीकेश ठाकरे, दिलीप साळुंखे, राजेंद्र देसले, कमलेश देवरे या विविध पक्षांच्या इच्छुकांसह अन्य काही जणांनी निरनिराळ्या मतदारसंघांसाठी अर्ज भरले. निवडणुकींतर्गत गुरुवारी (ता.२१) सकाळी अकरापासून अर्जांची छाननी होईल. विधिग्राह्य अर्जांची प्रसिद्धी शुक्रवारी (ता.२२), तर माघारीची प्रक्रिया ८ नोव्हेंबरपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत राबविली जाणार आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com